घरBudget 2024Vijay Wadettiwar : राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांनी फडणवीसांना धरले धारेवर

Vijay Wadettiwar : राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर वडेट्टीवारांनी फडणवीसांना धरले धारेवर

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 293 अंतर्गत अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला. यामधून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. राज्यात गुन्हेगारी वाढीस लागली आहे. एकीकडे आम्ही छत्रपती शिवरायांचे नाव घेतो, प्रभू श्रीरामांचे नाव घेतो. मात्र खरंच हे धर्माचे राज्य आहे का असे प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी सभागृहात बोलतांना उपस्थित केला. (Vijay Wadettiwar held Devendra Fadnavis on edge over issue of law and order in Maharashtra)

हेही वाचा… Maharashtra Budget Session : “मर्दासारखे बोला…”, विधानसभेत मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

- Advertisement -

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गृहमंत्र्यांच्या नागपूरात गेल्या 20 दिवसांमध्ये13 हत्येचे प्रकरण घडले असून हत्या सत्र थांबता थांबत नाही. मंत्रालयात गुन्हेगार रीलबाजी करून समाज मध्यमांवर प्रसारित करीत आहेत. तर एका सत्ताधारी नेत्याने आईवर आणि तिच्या मुलीवर अत्याचार केला आहे. असे अनेक प्रकार राज्यात घडत असतांना राज्याच्या गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे का? असा गंभीर प्रश्नच विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्र्यांना विचारला आहे. राज्यात गुन्हेगारीने डोके वर काढले असताना राज्याचे मुख्यमंत्री यांच मौन का आहे, अजित पवार देखील याबाबत काही का बोलत नाही? असा प्रश्न देखील वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला.

नागपूर शहरात गेल्या फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसांमध्ये मध्ये 13 हत्या झाल्या. यात एका प्रेस फोटोग्राफरचा देखील समावेश आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत गुंड सर्रास फिरत असल्याचे चित्र आहे. सोबतच मंत्रालयाच्या परिसरात हे गुंड रीलबाजी करून समाजात दहशत पसरवत आहेत. राज्यातील गुन्हेगारी विकोपाला जात असतानाच, नवी मुंबईतील सत्ताधारी पक्षाच्या एक नेत्याने आई आणि तिच्या मुलीवर अत्याच्यार केला आहे. राज्यात अशा प्रकारचे कृत्य घडत असतील तर यावर कोणी काही बोलणार आहे की नाही? राज्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या या घटना बघितल्या तर या राज्याचे भविष्य काय असेल? अशा बलात्काराच्या घटना होत असताना राज्यकर्त्यांनी एकमेकांना टाळी देण्यापेक्षा त्या मायलेकीकडे एखादे शस्त्र दिले असते तर सत्ताधारी नेत्याचा आज त्यांनी जीव घेतला असता. एकीकडे आम्ही छत्रपती शिवरायांचे नाव घेतो, प्रभू श्रीरामांचे नाव घेतो. मात्र खरंच हे धर्माचे राज्य आहे का? असा सवालही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे.

- Advertisement -

आज राज्यात ऑर्केस्ट्राच्या नावावर उघडपणे डान्सबार सुरू आहे. या सर्वांवर पोलिसांचा आशीर्वाद असल्यामुळेच या अशा घटना घडत आहे. निवडणुकांसाठी उभा राहणारा पैसा याच डान्सबार मधून पुरवला जातो का? याबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना देखील अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे, याबाबत चौकशी करून जर का माहिती घेतली, तर सर्वांची मान नजरेने खाली जाईल, अशा जहरी शब्दांत वडेट्टीवारांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -