घरताज्या घडामोडीMaharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत १०८ नव्या रुग्णांची वाढ, ७...

Maharashtra Corona Update: राज्यात गेल्या २४ तासांत १०८ नव्या रुग्णांची वाढ, ७ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांत १०८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १०६ रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७८ लाख ७४ हजार ६९०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४७ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला असून ७७ लाख २६ हजार २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९८.११ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या मृत्यूदर १.८७ एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ९५ लाख ७१ हजार ७५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७४ हजार ६९० (०९.९० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८६५ सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात संभाव्य एक्स-ई व्हेरीयंट

मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत एक्स-ई हा नवा व्हेरियंट आढळला आहे. ही महिला दक्षिण आफ्रिकेतून भारतात १० फेब्रुवारी २०२२ रोजी आली होती. तर २७ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणीत ही व्यक्ती कोविड बाधित आढळल्यानंतर सदर नमुना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आला. या प्राथमिक तपासणीत तो एक्स-ई व्हेरीयंट असल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या तपासणीत देखील सदर व्हेरियंट एक्स-ई असल्याचे आढळले असले तरी या नवीन व्हेरियंटची नि:संशय खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत या नमुन्याचे पुन्हा एकदा क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

सध्या हा रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित असून पुन्हा केलेल्या प्रयोगशाळा तपासणीत तो कोविड निगेटिव्ह आढळला आहे. एक्स-ई हा व्हेरीयंट बी.ए. १ आणि बी.ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.


हेही वाचा – Zombie Virus: बापरे! कोरोनानंतर आता माणसांना झॉम्बी बनवणारा व्हायरस आढळला हरणांमध्ये

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -