घरताज्या घडामोडीZombie Virus: बापरे! कोरोनानंतर आता माणसांना झॉम्बी बनवणारा व्हायरस आढळला हरणांमध्ये

Zombie Virus: बापरे! कोरोनानंतर आता माणसांना झॉम्बी बनवणारा व्हायरस आढळला हरणांमध्ये

Subscribe

अजूनही कोरोना महामारी संपुष्टात आली नाही. बऱ्याच देशांमध्ये कोरोनाचा अद्यापही धुमाकूळ सुरू आहे. यादरम्यान आता नव्या एका व्हायरसची एंट्री झाली आहे. कॅनडामध्ये हरणांमध्ये झॉम्बी नावाचा व्हायरस वेगाने पसरत आहे. हा व्हायरस मनुष्यासाठी खूप धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. तसेच हा व्हायरस मनुष्याच्या संपर्कात आला तर त्याच्यात झॉम्बीचे लक्षणे दिसतील, असे म्हटले जात आहे.

VICE World News वृत्तानुसार, कॅनडामध्ये हरणांच्या झुंडमध्ये एक अजब, दुर्मिळ आणि अधिक संसर्गजन्य व्हायरस पसरला आहे. कॅनडाच्या काही ठिकाणी याला क्रोनिक वेस्टिंग डिसीज (सीडब्ल्यूडी) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या व्हायरसमुळे संक्रमित झालेले हरिणी दुसऱ्या हरणांना मारून खात आहेत. ही महामारी हरणांमध्ये वेगाने पसरतेय, असे युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचे वाइल्डलाइफ स्पेस्लिस्ट मार्गो पिबस यांनी सांगितले. दरम्यान CWDने हरणांमधील हा धोकादायक व्हायरस इतर प्राणी आणि माणसांमध्ये पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मार्गो पिबस यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरी आणि पार्कलँडमधील हरणांमध्ये ही महामारी पसरत आहे. कॅनडामध्ये ही महामारी आजच नाही, तर सर्वात पहिल्यांदा १९९६मध्ये पाहायला मिळाली होती. यावेळेस एका फार्ममध्ये हा व्हायरस पसरला होता आणि त्यानंतर इतर प्राण्यांमध्ये तो वेगाने पसरला. त्यानंतर जेव्हा सर्व प्राण्यांना मारले गेले तेव्हा या व्हायरसवर नियंत्रण मिळवता आले होते.

२०१८मध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या काही भागांमध्ये हरणांमध्ये क्रोनिक वेस्टिंग डिसीज पसरला होता. या आजाराला झॉम्बी डियर डिजीज देखील म्हटले जाते. हा आजार अमेरिकेच्या २२ राज्यात आणि कॅनडाच्या २ राज्यातील हरणांमध्ये पसरला होता. तज्ज्ञांच्या मते, हा व्हायरस हरणांचा मेंदू, पाठीचा कणा आणि अनेक पेशींवर हल्ला करते. तसेच यामुळे प्राण्यांचे वजन अचानक कमी होते. मानसिक संतुलन बिघडते. ते खूप चिडतात आणि शेवटी त्यांचा मृत्यू होतो.

- Advertisement -

माहितीनुसार मनुष्याला या व्हायरसची लागण केवळ प्राण्याचे मांस खाल्ल्याने नाही तर त्यांची लघवी, लाळ, थुंकी यांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतो. मनुष्याला या व्हायरसची लागण झाल्यास डायरिया, डिप्रेशन आणि लकवा मारल्याची लक्षणे दिसू शकतात. अद्याप सुर्दैवाने मनुष्यांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाला नाहीये.


हेही वाचा – Corona Variant: मुंबईत कोरोना व्हेरियंटचे दोन नवे उपप्रकार आढळले, जिनोम सिक्वेसिंगचा चकीत करणारा अहवाल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -