घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात कोविड १९ची नियमावली लागू

महाराष्ट्रात कोविड १९ची नियमावली लागू

Subscribe

ही नियमावली १५ मार्चपासून पुढील एक वर्ष किंवा आवश्यकतेनुसार पुढील आदेश मिळेपर्यत अंमलात राहू शकते.

देशभरात थैमान घालत असलेल्या करोना व्हायरसमुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला जागतिक महामारी रोग म्हणून घोषित केले आहे. देशभरात करोनाचे वाढते प्रमाण पाहता सरकारकडूनही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यात करोना व्हायरसवर नियंत्रण यावे यासाठी महाराष्ट्रात ‘कोविड १९’ हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

काय आहे ‘कोविड १९’?

‘कोविड -१९’ हा नुकताच सापडलेल्या करोना व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये उद्रेक होण्यापूर्वी या नवीन विषाणू आणि आजारबद्दल माहित नव्हते. करोना व्हायरसवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात हा नवीन एपिडेमिकअॅक्ट लागू करण्यात आला आहे. याची एक नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीस ‘महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२०’ या नावाने संबोधले जाणार आहे.

- Advertisement -

काय आहे ‘कोविड १९’ची नियमावली?

ही नियमावली १५ मार्चपासून पुढील एक वर्ष किंवा आवश्यकतेनुसार पुढील आदेश मिळेपर्यंत अंमलात राहू शकते.

  1.  जागतिक आरोग्य संघटना आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून रोगाची लक्षणे नमूद केली जातील. ही लक्षणे आढळल्यास संशयित रूग्णाला एका स्वतंत्र कक्षेत ठेवण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत.
  2. या निर्णयात जर कोणी आक्षेप घेतला तर त्या व्यक्तीस भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल.
  3. ‘कोविड १९’चा हा नियम लोकहिताच्या उद्देशाने केला आहे. त्यामुळे या नियमावलीची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारे तक्रार किंवा गुन्हा दाखल करता येणार नाही.
  4. गावात, शहरात,कॉलनीत अथवा कोणत्याही ठिकाणी ‘कोविड १९’चा प्रादुर्भाव आढळल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी तिथले जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त असतील.
  5. ज्या ठिकाणी रूग्ण आढळून आला आहे तिथले भौगोलिक क्षेत्र प्रतिबंधीत करण्याचे अधिकार सरकारच्या संबधित यंत्रणांना आहे.
  6.  दुसऱ्या ठिकाणांवरून येणाऱ्या लोकांना तसेच वाहनांना बंदी घालण्याचे अधिकार सरकारच्या संबधित यंत्रणांना आहे.

हेही वाचा – कोरोना : WHO २१ अपेक्षित प्रश्न – उत्तरे

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -