घरमहाराष्ट्रज्यांना उद्योग नाहीत ते टीका टिप्पणी करतात - अजित पवार

ज्यांना उद्योग नाहीत ते टीका टिप्पणी करतात – अजित पवार

Subscribe

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्यावरून भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर टीका केली. ''चोरी केली नसेल, तर घाबरायचं कारण नाही'', असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी टीका केली. परंतु, सुजय विखे पाटीलांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांना कोणाला उद्योग नाहीत, ते टीका टिप्पणी करतात'', अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्यावरून भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर टीका केली. ”चोरी केली नसेल, तर घाबरायचं कारण नाही”, असं म्हणत सुजय विखे पाटील यांनी टीका केली. परंतु, सुजय विखे पाटीलांच्या या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांना कोणाला उद्योग नाहीत, ते टीका टिप्पणी करतात”, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं. शिवाय त्यांनी उपस्थित पत्रकारांना विनंती करत ”असल्या गोष्टीला जास्तीचं महत्वं देण्यापेक्षा मी आता इथं येऊन झट-झट निर्णय घेतले त्याला महत्व देऊ”, असंही म्हटलं.

केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर केला जात असल्याची टीका राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ईडी, सीबीआय यांच्या कारवायांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आलेले असताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर खोचक शब्दांमध्ये टीका केली. ”चोरी केली नसेल, तर घाबरायचं कारण नाही. आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले..देशात सत्तेचा वापर कुणी जास्त केला आहे, हे आणीबाणीच्या काळात देशाच्या जनतेनं पाहिलं आहे. कश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार देखील जनतेसमोर आला आहे”, अशा शब्दांत टीका केली. तसंच, ”ज्या लोकांनी पैसे खाऊन कारखाने बांधले, संस्था केल्या हा गरीब जनतेचा पैसा नव्हता का?” असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

- Advertisement -

भाजपा खासदार सुजय विखेंच्या या टीकेवर उत्तर देताना, ”एखाद्यानं केलेलं वक्तव्य गांभिर्यानं घेण्याची गरज आहे, अशाच वक्तव्यांवर आम्ही बोलू, त्यांच्या वक्तव्याला फार काय महत्व द्यायचं कारण नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं. आढावा बैठकीसाठी खेडमध्ये अजित पवारांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत भाष्य केलं.

नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील?

- Advertisement -

”चोरी केली नसेल, तर घाबरायचं कारण नाही. आम्ही तर त्यांना चोऱ्या करायला लावल्या नव्हत्या. त्यांनी चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले..देशात सत्तेचा वापर कुणी जास्त केला आहे, हे आणीबाणीच्या काळात देशाच्या जनतेनं पाहिलं आहे. कश्मीर पंडितांवर झालेला अत्याचार देखील जनतेसमोर आला आहे. ‘ज्या लोकांनी पैसे खाऊन कारखाने बांधले, संस्था केल्या हा गरीब जनतेचा पैसा नव्हता का?’, असा सवाल सुजय विखे पाटील यांनी केला आहे. तसंच, ज्याचं मन साफ असेल, त्यानं भीती बाळगू नये. जर एखाद्यानं चोरी केलीच नसेल, तर घाबरायचं कारण नाही. का प्रत्येकजण दररोज टीव्हीवर बोलतोय? एकही मंत्री कागदपत्र सादर करून म्हणत नाही की आम्ही स्वच्छ आहोत. तुम्ही चोऱ्या केल्या असतील, तर तुम्हाला पकडायचं नाही असा तर नियम नाहीये ना? देश पंतप्रधानांचं घर आहे. ते चौकीदार या नात्याने चोरांना पकडतील अशी अपेक्षा मला आहे”, असं सुजय विखे पाटील म्हणाले.

आघाडीचा संसार

‘महाविकास आघाडीचा संसार असा आहे, की यात लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. त्यानं काहीही मनमानी करावी, त्याला कुणी काही बोलत नाही. शिवसेना एका मुक्या बायकोसारखी आहे, जिला बोलता येत नाही. आणि काँग्रेसवाले वराती आहेत. ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती, पण ते बिन बुलाए जेवायला गेले आहेत. त्यांना लाज नाहीये. ते जेवायचं ताटही सोडत नाहीयेत. त्यांना हाणलं तर खाली बसून जेवतील पण ते लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत. नवरा मस्त मजा करतोय. ही मूक बायको, तिला झालेला त्रास सहन करायचा आहे. सवत जर आणली तर माझं काय. म्हणून ते मूक बायकोच्या भूमिकेत आहेत”, असं सुजय विखे पाटील यांनी म्हटलं.

‘आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नसून राष्ट्रवादी काँग्रेस चालवतेय’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चालवत नसून राष्ट्रवादी काँग्रेस चालवतेय अशी टीका केली होती. यावरही अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, ”महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे. तसंच, यामध्ये उद्धव ठाकरेंची भुमिका महत्वाची आहे आणि त्याला साथ देण्याचं काम राष्ट्रवादी पक्ष आणि बाळासाहेब थोारत आणि त्यांचा कॉंग्रेस पक्ष आम्ही करत आहोत”, असं त्यांनी म्हटलं.


हेही वाचा – वैफल्यग्रस्त माणसं आणि त्यांचा पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो; राऊतांची पडळकर अन् सोमय्यावर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -