घरताज्या घडामोडीmaharashtra lockdown 2021: अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच मिळणार पेट्रोल, राज्य सरकार लॉकडाऊन कडक...

maharashtra lockdown 2021: अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच मिळणार पेट्रोल, राज्य सरकार लॉकडाऊन कडक करणार

Subscribe

भाजीपाला,किराणा दुकानांना दिलेली सूट रद्द करणार

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कोरोना परिस्थिती भयावह झाली आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रादुर्भावाची साखळी रोखण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमध्ये कोणत्या कामांना मुभा आहे. तसेच कोणत्या अस्थापना बंद आहेत. राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाही करण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी राज्यातील प्रमुख शहरांत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघ झाले आहे. लॉकडाऊनमध्ये काही कामांना परवानगी दिली असल्यामुळे नागिरकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

मुंबईसह उपनगरांत, पुणे, औरंगाबादमध्ये नागरिकांची वर्दळ अजूनही कमी झालेली दिसत नसल्यामुळे लॉकडाऊन असूनही काही ठिकाणी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे राज्यात कोरोना रोखता येणार नाही म्हणून राज्य सरकार लॉकडाऊनमधील निर्बंध अधिक कडक करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

राज्यात कोरोना निर्बंधांची कडक अंमलबजावणी होत नसल्यामुळे अधिक कडक निर्बंध लागू करण्यत येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. नागरिकांची गर्दी कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. त्यामुळे आता फक्त अत्यावश्य सेवेतील लोकांनाच इंधन दिले जाणार आहे. तसेच अत्यावश्य कामाशिवाय लोकलचा वापर केल्यास संबंधितांवर कडक कारावाई करण्यात येणार आहे. तसेच भाजीपाला,किराणा दुकानांना दिलेली सूट रद्द करणार असल्याचा इशाराही मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -