घरताज्या घडामोडीWeather Alert: राज्यात 'या' दिवशी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता, पुण्यासह ११ जिल्ह्यांना...

Weather Alert: राज्यात ‘या’ दिवशी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता, पुण्यासह ११ जिल्ह्यांना अलर्ट

Subscribe

मागील दोन दिवसांपासून पुण्यात पाऊस सुरू आहे. या विकेंडला पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विकेंडला जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर सावधान कारण १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात सर्वाधिक पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पुण्यासह ११ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यात पाऊस सुरू आहे. या विकेंडला पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विकेंडला घराबाहेर पडताना पुणेकरांनो दहावेळा विचार करा.

- Advertisement -

१२ नोव्हेंबर रोजी राज्यातील सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे तर १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी राज्यातील पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर,उस्मानाबाद,बीड आणि लातून जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विकेंडला राज्यात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग हा ताशी ३० ते ४०० किमी इतका असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात पुणेकर गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत. दोन दिवसात पुण्याच्या हवेली येथे १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

- Advertisement -

दक्षिण भारतात गेल्या चार दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. बुधवारी चेन्नई,तिरुव्रुर,कांचीपूरम आणि पाँडेचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ११ आणि १२ नोव्हेंबरल दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय. ११ नोव्हेंबरला तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्ट्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर १२ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांना यलो तर काही राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.


हेही वाचा – Vaccine: केरळमध्ये २५ वर्षीय तरुणाने पायावर घेतली लस, कारण वाचून बसेल धक्का

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -