घरCORONA UPDATEVaccine: केरळमध्ये २५ वर्षीय तरुणाने पायावर घेतली लस, कारण वाचून बसेल...

Vaccine: केरळमध्ये २५ वर्षीय तरुणाने पायावर घेतली लस, कारण वाचून बसेल धक्का

Subscribe

आरोग्य विभागाच्या समंतीनंतर  प्रणवच्या पायावर लस देण्यात आली.

देशभरात कोरोना लसीकरणाला वेग आलाय. मोठ्या संख्येने नागरिक कोरोना लस घेत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी इंजेक्शनच्या स्वरुपात लस देण्यात येतेय. सर्वसामान्यपणे डाव्या हातावर कोरोना लस दिली जाते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हातावरच लस घेतली असेल. केरळमध्ये मात्र एका २५ वर्षीय तरुणाने पायावर लस घेतल्याचे समोर आलेय.  पायावर लस घेण्यामागचे कारणही तसेच आहे. या तरुणाचा जन्मच हातविना झाला. त्याला दोन्हीही हात नाहीत.  या तरुणाचे नाव आहे प्रणव बालसुब्रमण्यम. (Pranav Balasubrahmanyam)  हात नसल्याने प्रणवने पायावर कोरोना लस घेतली.  ( 25 Years Pranav Balasubrahmanyam born without both hands and recieve vaccine first done on leg in kerla) प्रणव बालासुब्रमण्यम हा केरळच्या अलाथुर येथे राहणारा आहे. सायकलिंग करुन लसीकरण करण्यासाठी तो लसीकरण केंद्रावर पोहचला असता त्याला पाहून सर्वजण हैराण झाले. प्रणवला दोन्ही हात नसल्याने लस कुठे द्यायची असा प्रश्न सर्वांना पडला. मात्र आरोग्य विभागाच्या समंतीनंतर  प्रणवच्या पायावर लस देण्यात आली.

मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत फोटो व्हायरल

- Advertisement -

प्रणव बालासुब्रमण्यम या २५ वर्षीय तरुणाने २०१९साली त्याच्या २१व्या वाढदिवसानिमित्त केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत सेल्फी घेतला होता. मुख्यमंत्र्यांसोबतचा प्रवणचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावेळी पूरग्रस्तांना प्रणवने मोठी मदत केली होती. आपल्या बचतीतून प्रवणने ५ हजार रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीला सुपूर्त केले होते.

प्रणव आहे चित्रकार 

प्रणवला दोन्ही हात नसले तरी प्रणव एक उत्तम कलाकार आहे. तो उत्तम चित्रकार असून आपली पेंटिंग विकून तो पैसे कमावतो. लहानपणापासून प्रणवचे कार चालवण्याचे स्वप्न आहे. आपल्याकडेही कार चालवण्याचे लायसन्स असावे असे त्याला वाटते मात्र त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – बी. एस. येडियुरप्पा आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -