घरCORONA UPDATEपोलीस दलातल्या बदल्यांसाठी पुन्हा मुदतवाढ! ५ सप्टेंबर नवीन तारीख

पोलीस दलातल्या बदल्यांसाठी पुन्हा मुदतवाढ! ५ सप्टेंबर नवीन तारीख

Subscribe

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्वच कामकाजांना ब्रेक लागलेला असताना शासकीय स्तरावरच्या बदल्यांना देखील ब्रेक लागणार की काय? अशी शक्यता होती. मात्र, या बदल्या करण्यासाठी आधी ३१ जुलैपर्यंत आणि नंतर १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर २०२०-२१ या वर्षातल्या पोलीस दलातल्या बदल्या करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ आता ५ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलातल्या बदल्या आता ५ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यपालांनी दिलेल्या आदेशांनुसार या बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षी एप्रिल-मे दरम्यान या बदल्या केल्या जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच बदल्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

police transfer order

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -