घरमहाराष्ट्रMaharashtra Voting Tournout : राज्यात ५७ टक्के मतदान

Maharashtra Voting Tournout : राज्यात ५७ टक्के मतदान

Subscribe

राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७४ टक्के मतदान झाले. नंदूरबार मतदार संघातील दुपारपर्यंतची अजूनही सर्वाधिक जास्त ४०.०५ टक्केवारी झाली असून कल्याणमध्ये सर्वात कमी २५.३१ टक्के मतदार झाले आहे.

- Advertisement -

 


महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाला ११ वाजेपर्यंत १८.३९ टक्के मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान हे नंदूरबार मतदार संघात २४.५९ टक्के तर सर्वात कमी कल्याण मतदार संघात १३.९१ टक्के मतदान झाले आहे.

- Advertisement -
११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

महाराष्ट्रातील १७ मतदार संघांमध्ये पहिल्या दोन तासात ६.८२ टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार- ८.७३ %, धुळे- ६.३१ %, दिंडोरी- ७.२८ %, नाशिक- ६.६९ %, पालघर- ७.८६ %, भिवंडी- ६.२१ %, कल्याण- ५ %, ठाणे- ६.७७ %, उत्तर मुंबई- ७.८५ %, उत्तर पश्चिम मुंबई- ६.९० %, ईशान्य मुंबई- ७ %, उत्तर मध्य मुंबई- ५.९८ %, दक्षिण मध्य मुंबई- ६.४५ %, मावळ- ६.६७ %, शिरुर- ७.०७ %, शिर्डी- ७.२८ % असे पहिल्या दोन तासात मतदान झाले आहे.

प्रियांका चोप्राने भारतात येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आता राजकीय मैदानात उतरली आहे. उर्मिलाला कॉग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिलानेही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचबरोबर नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. सारे काम छोड़ दो पहले वोट दो! असं म्हणत अभिनेता राजपाल यादव यानेही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. परेश रावल यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूडची धकधक गर्ल माधूरी दिक्षीतनेही मतदान चुकवले नाही. सकाळीच तीने आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाचे लाईव्ह अपडेट जाणून घ्या – 

Loksabha election Live Update: पहिल्या दोन तासात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -