घरमहाराष्ट्रराजीनाम्याच्या मागणीचा सिलसिला खपवून घेऊ नका; आघाडीत ठरले

राजीनाम्याच्या मागणीचा सिलसिला खपवून घेऊ नका; आघाडीत ठरले

Subscribe

आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडेंपासून सुरू झालेल्या राजीनाम्याच्या मागणीचा भाजपकृत सिलसिला यापुढे अजिबात खपवून घ्यायचा नाही. वनमंत्री राठोड यांच्या राजीनाम्याने भाजपच्या नेत्यांना बळ मिळाल्याचा त्या पक्षाचे नेते गैरफायदा उठवत असल्याने भाजपकडून होणार्‍या मंत्री वा अधिकार्‍यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जशास तसे उत्तर देण्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे.

मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनचे वाहन पार्क केल्याच्या आरोपावरून एनआयएने ताब्यात घेतल्यापासून भाजपच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली आहे. त्याआधी एका महिलेने केलेल्या आरोपावरून समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होत होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागणीला अजिबात दाद दिली नाही.

- Advertisement -

पुढे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका युवतीच्या आत्महत्येवरून राजीनाम्याची मागणी करत भाजपने राज्यभर आंदोलन पुकारले होते. ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे आंदोलन सुरू झाल्याने कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षांनी दिला होता. यात तडजोड म्हणून मग राठोड यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.

राठोड यांचा राजीनामा मिळाल्यानंतर भाजपचे नेते हरप्रकारे राजीनाम्याची आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करू लागले आहेत. सचिन वाझे प्रकरणात भाजपचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. काही नेत्यांनी तर पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांच्याही राजीनाम्याची मागणी केली. नारायण राणे यांनी तर थेट अमित शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारचे धुरीण असलेले शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांना भाजपच्या आरोपानंतर अस्वस्थ केले. एका मंत्र्याच्या राजीनाम्याचा भाजपचे नेते आजही गैरफायदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत भाजपच्या दबावाला बाकी न पडता जशास तसे उत्तर देण्यावर भर दिला. कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही मनःस्थितीत राजीनामा हा मार्ग होऊ शकत नाही, असे पवारांनी उद्धव यांना स्पष्ट सांगितल्याचे कळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -