घरमहाराष्ट्रमराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (ईडबल्यूएस) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी ही मोठी खुशखबर असणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजातील लोकांना शिक्षण आणि नोकरीत मोठा फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पाडण्यात आली. या बैठकीत एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असणाऱ्या उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही. ईडब्ल्यएस प्रमाणपत्र देताना एसईबीसी उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहीत केलेले निकष लावण्यात येतील. तसेच हे आदेश सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र. १५७ ३७/२०१९ व इतर याचिकांमधील अंतरीम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील, असे स्पष्ट करण्यात आले.


हेही वाचा – दहावी व बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; बारावीचा १८.४१ टक्के तर दहावीचा ३२.६० टक्के निकाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -