घरमहाराष्ट्रनागपूरनागपुरात मविआची वज्रमुठ सभा होणार! 'या' अटींसह पोलिसांकडून परवानगी

नागपुरात मविआची वज्रमुठ सभा होणार! ‘या’ अटींसह पोलिसांकडून परवानगी

Subscribe

नागपुरात १६ एप्रिलला होणाऱ्य महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचा मार्ग आता मोकळा झालाय. सतराशे साठ विघ्नं आडवे येत असताना अखेर नागपुरात मविआची वज्रमुठ सभा होणार आहे.

नागपुरात १६ एप्रिलला होणाऱ्य महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेचा मार्ग आता मोकळा झालाय. सतराशे साठ विघ्नं आडवे येत असताना अखेर नागपुरात मविआची वज्रमुठ सभा होणार आहे. कारण या वज्रमुठ सभेला पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. इथल्या दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होणार असून यासाठी पोलिसांकडून काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी या मैदानावर सभा घेण्यास विरोध दर्शवलाय. महाविकास आघाडीच्या सभेविरोधात स्थानिक नागरिकांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. जनहित याचिकेत केलेल्या मागणीनुसार यावर स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिलाय. तर दुसरीकडे याच सभेला पोलिसांनी अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. या सभेला जवळपास १० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आयोजकांनी पोलिसांना दिल्याचं कळतंय.

- Advertisement -

नागपूर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाविकास आघाडीच्या सभेला बुधवारी रात्री पोलिसांकडून परवानगी देण्यात आली. वेगवेगळ्या अटी घालून पोलिसांनी परवानगी दिली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी सभेसाठी अट घालण्यात आली आहे. ‘महाविकास आघाडीच्या नेत्यांनी १० हजार लोकांच्या क्षमतेसाठी परवानगी मागितली होती. सभेसाठी जास्त लोकं आली तर त्यांना सभा स्थळाच्या आधीच थांबविण्यात येईल. क्षमतेपेक्षा जास्त लोक येणार नाही याची काळजी आयोजकांनी घेणे गरजेचे आहे.’, असं देखील नागपूर पोलिस आयुक्तांनी सांगितलं.

वज्रमुठ सभेसाठी पोलिसांनी घातल्या ‘या’ अटी –

  • सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्या.
  •  सभेसाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधीत ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘स्टेज स्टॅबिलीटी’ प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे.
  • सभेच्यावेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • सभेदरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करु नये. तसंच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करू नये.
  • सभा ठिकाणाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये.
  • क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.
  • सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्देशनुसार आवाजाची मर्यादा असावी.

नागपुरात मविआच्या वज्रमुठ सभेचा मार्ग मोकळा झाला असला तरी या सभेसाठी मविआच्या तिन्ही पक्षात दुरावाच दिसून येतोय. दर्शन कॉलनीच्या मैदानावर सभेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मविआच्या तिन्ही पक्षाचे नेते स्वतंत्रपणे जात असल्याचं दिसून येत आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटानंतर आज राष्ट्रवादीचे नेतेही सभास्थळाची पाहणी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -