घरभक्तीVastu Tips : घरातील 'या' 2 दिशेला कधीही लावू नका आरसा; नाहीतर...

Vastu Tips : घरातील ‘या’ 2 दिशेला कधीही लावू नका आरसा; नाहीतर व्हाल कंगाल

Subscribe

जर घरातील आरसे योग्य दिशेला लावले नसतील तर, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पहायला मिळतो

वास्तू शास्त्रात आणि ज्योतिष शास्त्रात काही गोष्टींना अतिशय लाभकारी मानले जाते. वास्तू शास्त्रानुसार घरातील आरश्याचे आपल्या आयुष्याशी खास नातं जोडलेले असते. जर घरातील आरसे योग्य दिशेला लावले नसतील तर, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. परंतु जर ते वास्तू शास्त्रानुसार योग्य दिशेला लावले असतील तर तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी येईल, तसेच घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.

घरातील आरसे या दिशेस लावा

Vastu Tips for Placing Mirrors in Your Bedroom

- Advertisement -
  • वास्तू शास्त्रानुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिमेला आरसा लावू नये. कारण यामुळे घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच घरातील दोन आरसे कधी समोरासमोर लावू नये, यामुळे घरातील व्यक्तींमध्ये मतभेद होऊ लागतात.
  • वास्तू शास्त्रानुसार ब्रह्मांडामधील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमकडे आणि उत्तरेकडून दक्षिणकडे असा चालतो. त्यामुळे घरातील आरसे पूर्व किंवा उत्तर या दोन दिशेला लावावे, जेणेकरून आरश्यात बघताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला होईल.
  • वास्तू शास्त्रानुसार आरसा लावण्यासाठी सर्वात उत्तम दिशा पूर्व, उत्तर किंवा पूर्वोत्तर दिशा शुभ मानली जाते. या दिशेला आरसा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण राहते.
  • वास्तू शास्त्रानुसार घराच्या कपाटासमोर किंवा तिजोरीसमोर आरसा लावल्याने धनवृद्धी होते.
  • वास्तू शास्त्रानुसार बेडरूममधील आरसासुद्धा पूर्व किंवा उत्तरेला लावावा तसेच झोपताना कधीही आरश्यात तुमचे शरीर दिसणार नाही, याची काळजी घ्यावी. कारण जर झोपताना आरश्यात तुमचे शरीर दिसणे अशुभ मानले जाते. अशावेळी तुम्ही झोपताना आरसा पडद्याने झाकू शकतात, जेणेकरून तुमच्यावर त्याचा कोणता नकारात्मक परिणाम होणार नाही.
  • वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये कधीही फुटलेले आरसे ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मकता उत्पन्न होते.


हेही वाचा :

Vastu Tips : घराचा मुख्य दरवाजा दक्षिणेला असणं शुभ की अशुभ; जाणून घ्या त्याचे परिणाम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -