घरमहाराष्ट्रMalik & Patel : मलिकांबाबत मिरची लागलेल्या भाजपाला प्रफुल्ल पटेल कसे पटले?

Malik & Patel : मलिकांबाबत मिरची लागलेल्या भाजपाला प्रफुल्ल पटेल कसे पटले?

Subscribe

मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी जामीनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक काल, गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसले आणि त्यावरून आता जोरात राजकारण सुरू झाले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून ‘सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा’ असल्याचा सांगत त्यांच्या सत्तेतील सहभागावर आक्षेप घेतला आहे. पण आता या निमित्ताने अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल हे ठाकरे गट आणि काँग्रेसच्य रडारवर आले आहेत.

हेही वाचा – Ambadas Danve : अजित पवार गटातील आणखी एक नेता दाऊदशी संबंधित, दानवेंचे फडणवीसांना पत्र

- Advertisement -

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे विधानसभेत थेट सत्ताधारी बाकांवर बसल्याने ते अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद आणि त्याची बहीण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार शहावली खान यांच्या मदतीने नवाब मलिक यांनी कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा व्यवहार केला होता. या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. तर, 11 ऑगस्ट 2023 रोजी त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर झाला. यादरम्यान ते कारगृहातच होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून नवाब मलिक यांच्या सत्तेतील सहभागाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. त्यावर अजित पवार गटाने सावध भूमिका घेत, आमदार नवाब मलिक हे पक्षातील ज्येष्ठ सहकारी असून त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही – प्रफुल्ल पटेल

आता हाच निकष लावत ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच, गोंदिया विमानतळावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागतही केले. याच प्रफुल्ल पटेल यांचे दाऊद आणि त्याच्या हस्तकांशी संबंध आहेत. दाऊदच्या खास हस्तकाशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी ईडीने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत. तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तर, नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले म्हणून भाजपाला आग लागली; मग इक्बाल मिर्चीशी संबंधित जागेचा व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात? भाजपाच्या दृष्टीने इक्बाल मिर्ची देशभक्त आहे का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. दांभिकपणा भाजपाचा स्थायीभाव असून लोकांना ते मूर्ख समजतात, अशी टीप्पणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा – मलिकांवरील फडणवीसांच्या पत्रावर राऊतांचा टोला; “बाजूबाजूला बसून…”

प्रफुल्ल पटेल यांचे काय आहे प्रकरण?

प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या मालकीच्या मिलेनियम डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीने 2006-07मध्ये दक्षिण मुंबईत वरळी येथील सीजे हाऊस ही इमारत बांधली. ज्या जमिनीवर या इमारतीचे बांधकाम करण्यात आले, ती जमीन दाऊदचा हस्तक तसेच 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीची होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोबदला म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने इमारतीतील तिसरा आणि चौथा मजला इक्बालची बायको हाजरा मिर्ची हिच्याकडे हस्तांतरित केला. यानंतर इक्बाल मिर्चीचे नाव हवाला घोटाळ्यामध्ये आले. ईडीने सीजे हाऊसमधील तिसरा आणि चौथा मजला जप्त केला आहे. या जप्त करण्यात आलेल्या जागेची सध्याची किंमत ही बाजारभावानुसार 100 कोटी इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -