घरमहाराष्ट्रNawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही - प्रफुल्ल पटेल

Nawab Malik : देवेंद्र फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही – प्रफुल्ल पटेल

Subscribe

नवाब मलिक यांच्याशी राजकीय घडामोडीसंदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही, असे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे.

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात सहभागी झाले. यावेळी नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाकावर जाऊन बसले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले आहेत. फडणवीसांनी अजित पवारांनी लिहलेल्या पत्रचा काही वेळा अर्थ काढण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

फडणवीसांनी अजित पवारांना लिहलेल्या पत्रसादंर्भात प्रफुल्ल पटेल म्हणाले, “नवाब मलिक हे आमदार आहेच. ते आमचे जुने सहकारी आहेत. यामुळे आम्ही एकमेकांना भेटने आणि बोलणे हे स्वाभाविक आहे. आम्ही कुठेही नवाब मिलाकांची राजकीय भूमिका काय आहे? त्यांनी काय करायचे? त्यांची उद्याची वाटचाल काय असेल? या मुद्द्यांवर आम्ही अद्यापही नवाब मलिकांशी चर्चा केलेली नाही. ते वैद्यकीय जामीनावर असल्यामुळे आम्हाला त्यांना राजकीय विषयावर चर्चा करायची नाही. आता नवाब मलिक हे विधानसभेच्या आत कुठे बसले. विधानसभेत कोण कुठे बसले हे महत्वाचे नाही. विधानसभेत बसण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे. त्यामुळे ते आले आणि कोणाला भेटल्यानंतर आम्ही त्यांना पुरस्कृत करतो, असे म्हणणे म्हणजे दिशा भूल करणारी गोष्ट आहे”, असे प्रत्युत्तर प्रफुल्ल पटेल म्हणाले.

- Advertisement -

सरकार्यच्या तब्येतीची विचारपूस करणे आमचे कर्तव्य

नवाब मलिकाच्या भेटीसंदर्भात प्रफुल्ल पटेल म्हणाले, “नवाब मलिक जुने आणि ज्येष्ठ सहकारी अनेक वर्षापासून राहिलेले आहेत. मध्यल्या काळात नवाब मलिकांवर काही आरोप झाले. जे काही घडले ते सर्वांना माहिती आहे. या मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घाडमोडी झाल्या आहेत. यावेळी नवाब मलिक हे कोणाबरोबरही नव्हते. नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीनावर सुटल्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना भेटलो. आपल्या सरकार्यच्या तब्येतीची विचारपूस करणे हे आमचे कर्तव्य होते.”

हेही वाचा – ‘नवाब मलिकांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर…’; फडणवीसांच्या पत्रानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

उगीच गोंधळ निर्माण करण्याचे काम सुरू

तुमचे नेते म्हणतात की, नवाब मलिक आमचे नेते आहे आणि त्यांच्या बाजूने आहे, या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, “नवाब मलिक हे आमचे जुने आणि जेष्ठ नेते राहिलेले आहेत. आम्ही त्यांना अडचणीत टाकू इच्छित नाही. कराण ते जामीनावर आहेत. यामुळे आम्ही त्यांच्यासोबत कशासाठी राजकीय चर्चा करायची, ही आमची भूमिका आहे. कालपासून उगीच गोंधळ निर्माण करण्याचे काम सुरू आहे.”

हेही वाचा – मलिकांवरील फडणवीसांच्या पत्रास्त्रावर राऊतांचा टोला; “बाजू बाजूला बसून…”

मलिकांचे कुठलेही प्रतिज्ञापत्र आमच्याकडून सादर नाही

निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत नवाब मलिकांचे नाव आहे का? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, “नवाब मलिक यांच्याशी राजकीय घडामोडीसंदर्भात कोणतीही चर्चा केलेली नाही. आम्ही त्यांना आमच्यासोबत सामील केलेले नाही. म्हणून आम्ही नवाब मलिक यांचे कोणतेही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दिलेले नाही.”

हेही वाचा – ‘हा’ मराठी नेता निवडणार राजस्थानचा मुख्यमंत्री; तीन राज्यांसाठी भाजपाकडून 10 पर्यवेक्षकांची नियुक्ती

ज्यांना सल्ला देण्याची गरज नाही…

पत्र लिहण्यापेक्षा समोरा समोर बसून बोलावे, असे अशोक चव्हाणांनी म्हटले. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आता सर्वजण सल्ला देत आहेत. ज्यांना सल्ला देण्याची गरज नाही, ते पण आता देखील सल्ला देत आहेत. त्यांनी त्यांचा पक्ष व्यवस्थित चालवावा. त्यांची सल्ला आपआपासात द्यावी. आपला पक्ष कसा जिंकले यासाठी प्रयत्न करावे. उगाच दुसऱ्यांना सल्ला देण्याची काय गरज आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -