घरमहाराष्ट्रलग्नाचे आमिष दाखवून केली लाखोंची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून केली लाखोंची फसवणूक

Subscribe

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची ४ लाखांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. पैशाच्या फसवणूकीबरोबरच या भामट्याने तरुणीवर लैंगिक अत्याचारही केले. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आले.

नातेवाईकां समोर लग्नाचे नाटक करून एका उद्योजक तरुणीला चार लाखाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीला मंगळसुत्र आणि कुंकु लावून लग्न केल्याचे नाटक या तरुणाने केले होते. तरुणीकडून पैसे घेऊन हा तरुण पसार होत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुंबईतील एका खाजगी लॉजवर नेऊन या तरुणाने बलात्कार केला असल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बलात्कार आणि फसवणूक केल्याच्या कलमांअतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. अमित रंजन महापात्रा (वय ३०, रा. श्रीपल होम्स,अजिंक्य पार्क, बाणेर) असे या तरुणाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण

ही घटना ७ जुलै ते ५ ऑक्टोंबर २०१८ दरम्यान बाणेर येथील महापात्रा याच्या घरी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे. मागील काही महिन्यांपासून ही तरुणी आरोपी मुलाला ओळखत आहे. अगोदर आपणही बिझनेस करणार असल्याचे भासवून विश्वास संपादन केले. त्यानंतर व्यवसाय करायला पैसे दिले नाही तर लग्न करणार नाही, अशी धमकी देऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले होते. पैसे घेतल्यावर त्याने तिच्या घरातील लोकांच्या समक्ष या तरुणीला मंगळसुत्र घातले व कुंकुही लावले आणि लग्न झाल्याचा आभास निर्माण केला. या लग्नानंतर त्याने तिला आपल्या बाणेर येथील घरी नेले. मुंबईतील हॉटेल सन अँड सॅन या ठिकाणी त्याने तिच्यावर जबरदस्ती शरीर संबध साधल्याचा आरोप महिलेने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -