घरमहाराष्ट्रकोकणातील 'हापूस' आंब्याला टक्कर देणार विदेशातील 'मलावी आंबा'

कोकणातील ‘हापूस’ आंब्याला टक्कर देणार विदेशातील ‘मलावी आंबा’

Subscribe

अलिबाग : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातून निर्यात होणारा आंबा याला देशासह परदेशात मोठी मागणी असते. खवय्ये नेहमीच कोकणातील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. थेट आक्रिकन आंबा नवी मुंबईच्या मार्केटमध्ये दाखल झाला आहे. आफ्रीकन आंबा कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार आहे.

आफ्रिकेतील मलावी या ठिकाणावरून आफ्रिकन आंबा मुंबईतील एपीएमसी फळबाजारात मोठ्या प्रमाणावर येथील आंब्याची आवक सुरू झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये या मलावी आंब्याला मोठी मागणी आहे. मागील काही वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे.

- Advertisement -

पंधरा वर्षांपूर्वी कोकणातील हापूस आब्यांच्या झाडांची कलम आफ्रिकन देश मलावी मध्ये घेऊन जाऊन साडेचारशे एकर वर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. या आफ्रिकन आंब्याची चव कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच असल्याने या आंब्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.

मलावि आंबा महाराष्ट्र कोकणातील आंब्याला मोहर यायला सुरुवात होते म्हणजे नोव्हेंबर मध्येच मलावि आंबा तयार होऊन भारतामध्ये उपलब्ध होत आहे त्यामुळे त्याला चांगली किंमतही मिळत आहे. मलावी आंब्याच्या तीन किलोच्या एका बॉक्सची किंमत सध्या तीन हजार रुपये ते पाच हजारां पर्यंत आहे. 800 बॉक्सची आवक एपीएमसी बाजारात झाली आहे.
त्यामुळे भविष्यात हा आंबा कोकणातील हापूस आंब्याला स्पर्धा करणार हे यावरून दिसत आहे. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मलावी आंबा कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच गोड रसाळ आहे तसेच कोकणातील शेतकऱ्यांनी देखील निर्यातक्षम सेंद्रिय आंबा तयार करावा कमीत कमी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर शेतकऱ्यांनी करून निर्यातक्षम आंबा कोकणातून उपलब्ध झाला पाहिजे अशा आंब्याला महाराष्ट्रातील बाजारपेठ खुली होईल असे जाणकार आंबा व्यवसायिक यांचे म्हणे आहे.

- Advertisement -

कोकणचा राजा अर्थात हापूस आंबा खाणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील वाशी मार्केटला रवाना झाली आहे. देवगड हापूसच्या यावर्षीची पहिली पेटी पाठवण्याचा कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाला आहे. देवडमधील कातवण गावातील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूस आंबे मुंबईतील वाशी मार्केटला पाठवले आहेत. आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे. “या आंब्यांना किती दर मिळेल यावर सर्व शेतकऱ्यांचं पुढील आर्थिक गणित अवलंबून आहे,” अशी प्रतिक्रिया या आंबा बागायतदारांनी दिली

परतीच्या पावसाचा आंब्याला फटका

दरवर्षी वाशी एपीएमसीमध्ये फेब्रुवारी महिन्यात हापूस आंब्याच्या आवक होण्यास सुरुवात होते. त्यानंतर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवक वाढून मुख्य हंगाम जोर पकडतो. यंदा आंब्याचं उत्पादन कमीच राहणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. परतीच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे आंब्याची पहिली पेटी जरी दाखल झाली असली तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरु अजून अवधी आहे.

नवी मुंबई बाजार समितीत तीन किलोच्या २७० पेट्यांची म्हणजे पाच टनहून अधिक मलावी आंब्याची आवक झाली. येत्या महिनाभरात सुमारे ४० टन आंबा मुंबईत दाखल होईल. इंधनाचे दर वाढल्यामुळे हवाई वाहतूक महाग झाली आहे. त्यासह आयात आणि अन्य करांमुळे आंब्याचे दर वाढले आहेत. मालावी आंबा तीन किलोच्या पेट्यांमधून आला असून, एक पेटी ३६०० ते ४५०० रुपये दरांने होलसेल विक्री झाली आहे. मागणी चांगली असल्यामुळे काही तासाच आयात झालेल्या सर्व आंब्यांची विक्री झाली आहे.

या पेट्या कुलाबा, कफ परेड आणि कॉफर्ड मार्केट येथील होलसेल व्यापाऱ्यांनी विकत घेतल्या आहेत. पुढील महिनाभर आठवड्यातून दोन वेळा आंब्याची आयात होणार आहे. आयात वाढत्यानंतर हा आंबा अहमदनगर, सुरत, बेळगाव आदी बाजार समितीत विक्रीसाठी पाठविला जाणार आहे. देवगड हापूसला ज्या ठिकाणी मागणी असते, त्या ठिकाणी हा आंबा पाठविण्याचे नियोजन आहे.आफ्रिकेतील या मालावी आंब्याला अमेरिका, आखाती देश आणि मलेशियात मोठी मागणी असते, त्यामुळे मालावी आंब्याचे दर कायमच चढे असतात, :-.संजय पानसरे.आंबा व्यापारी तथा संचालक,बाजार समिती,वाशी नवी मुंबई.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -