घरताज्या घडामोडीठाकरे गटाचा 1 जुलैला 'भीती मोर्चा', मनीषा कायंदेंचं टीकास्त्र

ठाकरे गटाचा 1 जुलैला ‘भीती मोर्चा’, मनीषा कायंदेंचं टीकास्त्र

Subscribe

राज्यातील राजकारणात अनेक ट्विस्ट येताना दिसत आहेत. पालिकेवर 25 वर्ष सत्तेवर असणाऱ्या ठाकरे गटाला आता पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात विराट मोर्चा काढावा लागत आहे. तर या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेतून शिंदे गटात आलेल्या विधान परिषद आमदार मनीषा कायंदेंनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. 1 जुलैचा मोर्चा हा भीती मोर्चा असल्याचे मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत. कारवाई आणि कॅगच्या अहवालावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भीती मोर्चा काढण्यात येणार असल्याची टीका कायंदे यांनी केली आहे.

शिंदे गटाच्या सचिव आणि विधान परिषद आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंनी 1 जुलैला मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. यावर कायंदेंनी पलटवार केला आहे. कोरोना केंद्रे उभारणी, जमीन खरेदी, रस्ते-बांधणी आदी सुमारे 12 हजार 24 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या 76 कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशीत उद्वव ठाकरेंच्या काळात गैरव्यवहार झालाचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र यालाच छेद देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना (उबाठा)वतीने 1 जुलैला ‘भीती मोर्चा’ काढण्यात येणार असल्याचा टोला शिवसेना सचिव व प्रवक्त्या मनिषा कायंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

- Advertisement -

करोनाकाळात मुंबईमहानगर पालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या कोरोना केंद्रांत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साठम यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावेळी या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली होती. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी ‘कॅग’ने दर्शवली. त्यानुसार ‘कॅग’चे पथक पालिकेत दाखल झाले. यात महापालिकेतील करोना केंद्रे उभारण्यातील गैरव्यवहार, करोनाच्या नावाखाली वारेमाप खरेदी, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांना कंत्राट देणे, दहीसर येथील जमीन खरेदी प्रकरण, रस्ते बांधणी अशा सुमारे 12 हजार 24 कोटी रुपये खर्चाच्या कामांचे ‘कॅग’च्या माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. त्यानुसार नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशीत उद्वव ठाकरेंच्या काळात गैरव्यवहार झालाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यानुसार या चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर, विशेष तपास पथक (एसआयटी)कडून चौकशी होईल आणि जे काही असेल ते समोर येईल. पण कोणतीही चौकशी सुडबुद्दीने, आकसापोटी किंवा राजकीय हेतूने केली जाणार नाही. चौकशीत पारदर्शकता असेल, असे देखील कायंदें यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे गटाचे धाबे दणाणले – कायंदे

मुंबई महापालिकेच्या कामकाजातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमुळे उबाठा गटाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर हा मोर्चा असल्याचे सांगितले जात आहे. खरे तर हा भीती मोर्चा आहे. जर तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला निडरपणे सामोरे जाण्याची गरज आहे. चौकशी लावल्यावर पोटात भीतीचा गोळा का आला, भ्रष्ट्राचाराचा मुद्दा असेल तर मागील इतिहास देखील तपासावा लागेल, असा हल्ला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. महापालिकेच्या कामाची चौकशी लावली तर महापालिकेवर मोर्चा का काढावा लागतो याचा विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. कॅगचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करु नये, अशी तुमची इच्छा आहे का, असे त्यांनी विचारले. मुंबईकरांची दिशाभूल करु नका, असे कायंदे म्हणाल्या.


हेही वाचा : Uddhav Thackeray : भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी 1 जुलैला महापालिकेवर विराट मोर्चा काढणार – उद्धव ठाकरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -