घरमहाराष्ट्रSupriya Sule : मोडेन पण वाकणार नाही... सुप्रिया सुळेंचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

Supriya Sule : मोडेन पण वाकणार नाही… सुप्रिया सुळेंचे शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

Subscribe

 

मुंबईः गद्दार दिवस साजरा होत असताना कारवाई होत असेल तर मोडेन पण वाकणार नाही, असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

- Advertisement -

हेही वाचाःShivsena Split One Year : शिवसेनेच्या बंडाची वर्षपूर्ती; सत्तांतराचे ‘ते’ दहा दिवस

एकनाथ शिंदे यांनी एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी शिवसेनेत बंड केले. या वर्षपूर्तीला ठाकरे गटाकडून गद्दार दिवस म्हणून आंदोलन करण्यात आले. ठिकठिकणी हे आंदोलन झाले. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही गद्दार दिवसाचे आंदोलन केले. या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केली. त्यावर सुप्रिया सुळे संतप्त झाल्या. या राज्यात लोकशाही राहिली आहे का? आंदोलनाला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तर दडपशाहीच्या विरोधात आम्ही लढतच राहणार आहोत. महाराष्ट्र ना कभी झुका है, ना कभी झुकेगा, मोडेन पण वाकणार नाही, असे आव्हानच सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

- Advertisement -

जे गद्दार आहेत त्यांना गद्दार म्हणण्याची ताकद माझ्यात आहे. आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत. हा दिवस साजरा केला म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकणार असाल तर तुमच्यात हिंमत असेल तर मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना तुरूंगात टाकाच. आम्ही जेलभरो आंदोलन करु, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.

५० खोके तुम्हाला हवे आहेत का?, अशी ऑफर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना याची माहिती द्यायला हवी. तुमच्या सरकारमधील मंत्री भ्रष्टाचाराची ऑफर देतात. मोदीजींनी सांगितले होते की ना खाऊंगा, ना खाने दुंगा, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, वर्तमानपत्रात वाचले आणि टीव्हीवर बघितले की आज गद्दार दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्रात जे घडलं त्याला गद्दार दिवस म्हटले जाते. पण काही जण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हणत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते हे ते आता विसरले आहेत.

गद्दार दिनाला मान्यता दिल्याबद्दल आभार; संजय राऊतांचा टोला

ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी ठिकठिकाणी गद्दार दिनाचे आंदोलन केले. हे आंदोलन करणाऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारने कारवाई केली. याचा अर्थ सरकारने गद्दार दिनाला मान्यता दिली. गद्दार दिनाला प्रतिष्ठा आणि मान्यता दिल्याबद्दल सरकारचे आभार आणि कौतुकच करायला हवं, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना हाणला. संजय राऊत म्हणाले, गद्दार दिनानिमित्त ठाकरे गटाचे ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वातही राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले आहे. आंदोलन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. याबाबत मी उद्धव साहेबांशी मगाशी बोललो. आंदोलनावर कारवाई होत आहे म्हणजे सरकारने गद्दार दिनावर शिक्कामोर्तब केले आहे. हा आमच्या विरोधात दिवस आहे. तो साजरा करु नये, हाच सरकारचा हेतू आहे. म्हणूनच सरकारने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मी युनोत मागणी केली आहे की गद्दार दिन साजरा करायला मान्यता द्यावी. जसा फादर्स डे, मदर्स डे साजरा होतो. तसाच २० जून हा गद्दार दिन म्हणून साजरा करावा. कारण आजच्या दिवशी जे झाले आहे ते केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला धोकादायक आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -