घरमहाराष्ट्रमराठा नेत्यांनी गोंधळ घालू नका अन्यथा मराठा आरक्षण गमावून बसाल - प्रकाश...

मराठा नेत्यांनी गोंधळ घालू नका अन्यथा मराठा आरक्षण गमावून बसाल – प्रकाश आंबेडकर

Subscribe

मराठा आरक्षणाच्या विषयात मराठा समाजाच्या नेत्यांनी गोंधळ करु नये, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. मराठा आरक्षणवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा नेते आक्रमक झाले आहेत. यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा नेत्यांनी थोडा संयम बाळगावा, मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करु नये, अन्यथा राज्यातील आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते, असा सल्ला दिला आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणासंबंधी मते मांडली.

मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर राज्यातील काही नेत्यांनी ओबीसी समाजाने मोठं मन करुन मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करुन घ्यावं, अशी विनंती केली आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मी जे काही समाज माध्यमांवर वाचतोय त्यावरुन हेच दिसतंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळावं मात्र आमच्या ताटातलं नको, अशी ओबीसी समाजाची भूमिका आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी हा वाद अधिक गुंतागुंतीचा करु नये. ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत मराठा नेत्यांनी पडू नये,” असं आवाहन केलं आहे. मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला आल्यास मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय कायम ठेवेल आणि निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल. त्यामुळे सुरळीत चाललेलं आंदोलन, मागणी सर्वोच्च न्यायालय मान्य करण्याच्या परिस्थितीत असताना त्याला खो घालू नये, असं माझ्या सर्व मराठा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

- Advertisement -

ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यावर पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मराठा समाज हा फक्त महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जरी मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो केवळ २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी समाज जर एकत्र आला तर मराठा समाजाला जे महाराष्ट्रापुरतं मिळणारं आरक्षण आहे तेही मिळणार नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या एका स्टे ऑर्डरने मराठा समाजाने घाबरुन जाऊ नये,” असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.


हेही वाचा – तबलिगींच्या कार्यक्रमामुळे कोरोनाचा फैलाव; सरकारने दिली माहिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -