घरमहाराष्ट्रधक्कादायक! मराठा समन्वयक रमेश केरे यांचा फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! मराठा समन्वयक रमेश केरे यांचा फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत त्यांनी फेसबुक लाईव्ह करत विष प्राशन केले आहे. मुंबईत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अलीकडेच मराठा क्रांती मोर्चाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. केरे यांच्या कृत्यामुळे मराठा क्रांती मोर्चाला मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

रमेश केरे यांनी फेसबुक मांडली भूमिका

आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजालाा ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. मराठा समाजातील विद्यार्थ्य़ांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे. माझं काम प्रामाणिक असल्यामुळे अनेकदा त्याची दखल घेण्यात आली, पण काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात माझी जाणून बुजून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी जाणून बुजून बदनामी केली जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असेल ज्या लोकांनी व्हिडीओ क्लीप व्हायरल केली त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे, असं म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -