घरमहाराष्ट्रMaratha Reservation : ...म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Maratha Reservation : …म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे; फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे किंवा सर्व पक्षांची बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी केले आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maratha Reservation so the Chief Minister Eknath Shinde has clearly said Devendra Fadnavis responded)

हेही वाचा – Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे; सुप्रिया सुळेंची मागणी

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणीबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. हे सर्वांनाच माहित आहे की, मागच्या काळामध्ये आमच्या सरकारने आरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं होतं. देशामध्ये हे एकमेव आरक्षण आहे तामिळनाडूनंतर जे उच्च न्यायालयात टिकलं होतं. जोपर्यंत आमचं सरकार होतं तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातही त्यावर स्थगिती आली नाही. मात्र त्यानंतर जे काही घडलं, आपल्या आता राजकारण करायचं नाही. राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी (22 ऑक्टोबर) अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा समाजाला सरकार आरक्षण देईल. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहोत. हा गंभीर प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – शरद पवारांनंतर सुशीलकुमार शिंदेंनीही दौरा केला रद्द; पंढरपुरातील मविआची सभा पुढे ढकलली

- Advertisement -

घाईघाईत निर्णय घेतला तरी विरोधक टीका करतील

जरांगे पाटलांनी दिलेली वेळ संपत आली आहे, तर कुठेतरी समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नक्कीच समन्वयाचा प्रयत्न करणार आहे. शेवटी प्रश्न जे जटील असतात आणि विशेषत: ज्यामध्ये संविधान, न्यायपालिका यांचा समावेश असतो. त्यावेळी निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्यायला लागतो. आज एखादा घाईघाईत निर्णय घेतला आणि तो उद्या न्यायालयात टिकाल नाही तर पुन्हा टीका होईल की, मराठा समाजाला मूर्ख बनवण्याकरता निर्णय तुम्ही घेतला. म्हणून एकनाथ शिंदे यांनी रविवारी (22 ऑक्टोबर) स्पष्टपणे सांगतिलं की, जो टिकणारा निर्णय आहे, अशाप्रकारचा निर्णय आम्ही घेऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -