घरICC WC 2023अनुष्कानं केलं विराट कोहलीचं भरभरून कौतुक; म्हणाली, स्टॉर्म चेंजर...

अनुष्कानं केलं विराट कोहलीचं भरभरून कौतुक; म्हणाली, स्टॉर्म चेंजर…

Subscribe

न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीची धमाकेदार खेळी पाहून अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लिहिले, "भारत 4 विकेट्सने जिंकला' या फोटोला अनुष्कानं कॅप्नन दिलं, 'स्टॉर्म चेंजर'.

मुंबई: ICC ODI वर्ल्ड कप 2023 मध्ये रविवारी 22 ऑक्टोबर 2023 रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीनेही पुन्हा एकदा आपली उत्कृष्ट लय दाखवत 95 धावांची खेळी खेळली. मात्र, त्याचे शतक पाच धावांनी हुकले. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याच्या या धमाकेदार खेळीवर कशी प्रतिक्रिया दिली ते वाचा. (INDIA VS New Zealand Anushka Sharma praised Virat Kohli a lot Said Storm Changer)

विराट कोहलीच्या कामगिरीवर अनुष्का शर्माची प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीची धमाकेदार खेळी पाहून अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि लिहिले, “भारत 4 विकेट्सने जिंकला’ या फोटोला अनुष्कानं कॅप्नन दिलं, ‘स्टॉर्म चेंजर’.

- Advertisement -

यानंतर अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर विराटचा सामन्यातील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये विराट कॅच आऊट झालेला दिसत आहे.

- Advertisement -

अनुष्का शर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. न्यूझीलंडने दिलेले 274 धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विराट कोहलीने 104 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 95 धावांची खेळी केली. मात्र, 47व्या षटकात विराट कोहलीने षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आपले शतक पूर्ण केले, मात्र ग्लेन फिलिप्सच्या चेंडूवर तो मॅट हेन्रीकडे चौकारावर झेलबाद झाला.

भारतीय संघाने 20 वर्षे जुना विक्रम मोडला

न्यूझीलंड संघ सलग 20 वर्षांपासून आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवत आहे. भारतीय संघाने रविवारी हा रेकॉर्ड मोडीत काढला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि निर्धारित 50 षटकात न्यूझीलंड संघाने 10 गडी गमावून 273 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 48 षटकांत 6 गडी गमावून 274 धावा केल्या आणि सामना चार विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात रोहित शर्माने 46 धावा, शुभमन गिलने 26 धावा, विराट कोहलीने 95 धावा, श्रेयस अय्यरने 33 धावा, केएल राहुलने 27 धावा आणि रवींद्र जडेजाने 39 धावा केल्या.

(हेही वाचा: IND Vs NZ सामन्याची क्रेझ, ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘इतक्या’ कोटी लोकांनी पाहिली लाइव्ह मॅच )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -