घरमहाराष्ट्रMaratha Reservation : सुप्रिया सुळेंसह हसन मुश्रीफ अन् शंभुराज देसाई यांनीही छगन...

Maratha Reservation : सुप्रिया सुळेंसह हसन मुश्रीफ अन् शंभुराज देसाई यांनीही छगन भुजबळ यांना सुनावले

Subscribe

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा वि. ओबीसी हा वाद पेटण्यास सुरुवात झाली आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असे आवाहन ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडे केले होते. यानंतर शिंदे गटातील उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी छगन भुजबळ यांचे कान टोचले होते. एवढेच नाही तर त्यांच्या पक्षातील सहकारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही छगन भुजबळ यांना घरचा आहेर दिला आहे. मात्र छगन भुजबळ यांनी रविवारी (26 नोव्हेंबर) महाएल्गार सभेतून सरकारकडून स्थापन करण्यात आलेली शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणी केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (Maratha Reservation Supriya Sule along with Hasan Mushrif Shambhuraj Desai also heard Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Supriya Sule : मंत्र्यांना नेमकी भीती कशाची? सुप्रिया सुळेंचा भुजबळांसह केसरकरांवर निशाणा

- Advertisement -

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, छगन भुजबळ यांचा सन्मान करून मी बोलणार आहे. परंतु माझी विनम्रपणे विनंती आहे की, त्यांनी ते ज्या मागण्या व्यासपीठावरून करत आहेत, त्या मागण्या त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत बोलाव्यात. त्यामुळे राज्यातील वातावरण दुषित होणार नाही. छगन भुजबळ यांच्या मागणीवर भाजपाच्या 105 आमदारांपैकी 9 मंत्री आहेत, ते काहीच बोलताना दिसत नाहीत. मात्र राज्यात 200 आमदार असताना त्यांच्या मंत्र्यांना व्यासपीठावर बोलावं लागत आहे, हे दुर्दैवी आहे, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला.

शंभूराज देसाई यांनी टोचले भुजबळांचे कान

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या छगन भुजबळाच्या मागणीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे कान टोचले होते. ते म्हणाले की, ही समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. मंत्रिमंडळाने एकत्र येत विचाराने निर्णय घेतला आहे. भुजबळ हे मंत्रीमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे वेगळे मत असेल, तर त्यांनी ते जाहीर सभेत मांडायला नको होते. त्यांनी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला हवी होती. कारण मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णय बदलायचा असेल, तर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली पाहिजे. त्यांनी समितीसमोर बोलावे, असे जाहीर मत व्यक्त करणे उचित नाही, यातून मतभेद होतील. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर आम्ही चर्चा करु त्यावर नक्कीच मार्ग निघेल, असे शंभुराज देसाई म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Dharmaveer 2 : एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चित्रपटाचा शुभारंभ; ठाकरे गटावर टीकास्त्र

हसन मुश्रीफांकडून भुजबळांना घरचा आहेर

छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध करताना हसन मुश्रीफ यांनी घरचा आहेर दिला आहे. ते म्हणाले की, छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे, पण कुणबी दाखले देण्याबाबत त्यांचे वेगळे मत आहे. परंतु कुणबी दाखले योग्य आणि कायदेशीर असतील तर, त्यांना ओबीसी दाखले द्यावेच लागतील. कुणबी दाखले योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी अधिकार समितीला आहे. मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत असल्यानं छगन भुजबळ यांना प्रश्न पडला असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना याबाबत सांगितलं पाहिजे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -