घरमहाराष्ट्रनाशिकमराठी साहित्य संमेलन:साहित्यिकांच्या घरांवर विद्युत रोषणाई

मराठी साहित्य संमेलन:साहित्यिकांच्या घरांवर विद्युत रोषणाई

Subscribe

घरासमोर रांगोळी, गुढी उभारा : महापालिका आयुक्तांचे आवाहन

नाशिक – साहित्य संमेलनानिमित्त नाशिक नगरी स्वारस्वतांच्या स्वागतासाठी सजू लागली आहे. सजावटीच्या उपक्रमात पालकसंस्था म्हणून महापालिकेनेदेखील आर्थिक मदतीसह प्रत्यक्ष सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेतर्फे शहरातील नामवंत साहित्यिकांच्या निवासस्थानावर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिककरांनी साहित्य उत्सवाच्या दिवशी घरासमोर सडा, रांगोळी काढण्याबरोबरचं गुढ्या उभारून ‘माय मराठीचा’ असा उत्सव साजरा करण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

कुसुमाग्रजनगरी, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे ३, ४ व ५ डिसेंबर रोजी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी मध्ये मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. समिती प्रमुखांकडून सोपविलेल्या जबाबदारीवर अंतिम हात फिरविण्याचे काम आहे. आमदार निधीतून लोकप्रतिनिधींनी प्रत्येकी १० लाख रुपये संमेलनासाठी दिले आहेत. नाशिक महापालिकेने 25 लाख रुपये दिले आहेत. महापालिकेमार्फत बसेस पुरविण्यासह विद्युत व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि साहित्यिकांच्या निवासस्थानावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

स्वांतत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले अभिनव भारत, कुसुमाग्रज स्मारक, कवी गोविंद, वसंतराव कानेटकर, बाबूराव बागूल, वामनदादा कर्डक, शांताबाई दाणी या दिवंगत साहित्यिकांबरोबरचं साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, चंद्रकांत महामिने, रावसाहेब कसबे आदींच्या निवासस्थानावर विद्युत रोषणाई केली जाणार आहे.   – कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -