घरमहाराष्ट्रभाजप राज्यात क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंचे स्मारक दुर्लक्षित

भाजप राज्यात क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंचे स्मारक दुर्लक्षित

Subscribe

राजगुरुंच्या स्मारकाची प्रतिक्षा गेल्या अनेक दिवसांपासून असताना पालकमंत्री, खासदार, आमदार उदासिन आहेत.

उगवत्या सुर्याची साथ देत पुर्वीचे खेड आणि आता राजगुरुनगर येथील पवित्र अशा भिमानदीच्या तिरावर हुतात्मा राजगुरु यांचे जन्मस्थळ असून इथेच त्यांचे बालपण गेले होते. ते राहत असलेल्या या वाड्याला मोठा इतिहास आहे, तरिही देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर जाणाऱ्या राजगुरु यांच्या जन्मस्थळाचे स्मारकात रुपांतर करण्यात गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षच होत राहिले आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे स्मारकच्या बाबतीतही सरकारची अशीच उदासीनता दिसत आहे.

थोरल्या वाड्याचे काम चार वर्षापुर्वी ९५ लाख रुपये खर्च करुन सागवाणी लाकडात झाले. मात्र कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. आता या सागवाणी लाकडाला भेगा पडल्या असून अनेक ठिकाणी लाकडाचा भाग फुगलेला आहे. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या हुतात्माच्या स्मारकाकडे जबाबदारीने लक्ष देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचीही तरतुद झाली. आजुबाजुला रहाणाऱ्या नागरिकांनी या हुतात्म्याच्या स्मारकासाठी आपले कर्तव्य समजून जागा देण्याची तयारी दाखवली. मात्र सरकार व प्रशासनाची इतकी उदासीनता आहे की, हे स्मारक होण्याची अजूनही प्रतिक्षाच करावी लागत आहे.

- Advertisement -
Rajguru Nagar memorial 3
सागाच्या लाकूड खराब झाले आहे.

देशातील प्रत्येक नागरिकाला या हुतात्म्याच्या स्मारकाकडे पाहिल्यानंतर एक वेगळीच प्रेरणा व ताकद येते. त्यातून एक नवी पिढी देशसेवेसाठी पुढे येण्यास मदत होते. स्मारकाला भेट देण्यासाठी येणारे नागरिक, विद्यार्थी यांच्या स्मारकाकडून काही अपेक्षा आहेत, त्या ते बोलूनही दाखवतात. मात्र या उदासीन सरकारची ही उदासीनता कधी संपेल आणि भव्य असे स्मारक कधी उभे राहिल, हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

पंजाब राज्यात हुतात्मा भगतसिंग, सुखदेव यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली जाते. मात्र राजगुरुंच्या जयंतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असून जन्मदिन (२४ ऑगस्ट) आणि बलिदान दिन (२३ मार्च) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकिय स्तरावर साजरा करावा, अशी मागणी राजगुरुप्रेमी करत आहे

- Advertisement -

भिमाशंकर विकास आराखडा मंजूर झाला तेव्हाच हुतात्मा राजगुरु भव्य स्मारकाचा विकास आराखडा मंजुरीची अपेक्षा होती. मात्र त्यावेळीही आमची निराशाच झाली सध्यातरी पुरवणी बजेटच्या अगोदर तरतूद करुन मिळावी आणि उच्चस्तरीय समितीने मंजुरी द्यावी – अतुल देशमुख, अध्यक्ष हुतात्मा राजगुरु स्मारक समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -