घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ; १७ बालकांचा मृत्यू

महाराष्ट्रात गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ; १७ बालकांचा मृत्यू

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात गोवरच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या गोवरमुळे राज्यातील एकूण १७ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (Measles outbreak in Maharashtra 950 children affected 17 children died)

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात गोवरचे १४ हजार ८८० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ९५१ गोवरच्या रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, मुंबईतील ११, भिवंडी तीन, ठाणे मनपा दोन, तर वसई विरारमधील एक अशा १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या मृत बालकांपैकी एकाच बालकाने गोवरचा पहिला डोस घेतला होता. उर्वरित १६ बालकांनी एकही डोस घेतला नसल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, राज्यातील मृत बालकांपैकी ९ मुले तर ८ मुली आहेत. शून्य ते अकरा महिन्यातील चार, एक ते दोन वर्षे वयोगटातील १०, २ ते ५ वर्षातील २ आणि पाच वर्षापुढील एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू यावरून एक ते दोन वर्षातील बालकांचा मृत्यू सर्वाधिक असल्याचेही दिसून येते.

राज्यात सध्या गोवरच्या लसीचे जिल्हा स्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर मिळून १३ लाख ५३ हजार इतका साठा उपलब्ध आहे. यामध्ये प्रत्येक संशयित गोवरच्या रुग्णाला जीवनसत्व अ चे दोन डोस देण्यात येतात.

- Advertisement -

गोवरचा संसर्ग रोखून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने ११ तज्ज्ञ डॉक्टरांचा राज्यस्तरीय कृती गट (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आला आहे. राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली या कृती गटात ११ सदस्य आहेत.

मुंबईच्या १६ प्रभागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरला प्रतिबंध करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून सर्वतोपरीने उपाययोजना करण्यात येत आहेत. लसीकरणावर भर देण्याबरोबरच गोवरबाधित आणि संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गोवरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कस्तुरबा रुग्णालयासह शहरातील अन्य सात रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था केली आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये एकूण ३३० खाटा उपलब्ध आहेत.


हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -