घरमहाराष्ट्रअलिबागच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा

अलिबागच्या मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा

Subscribe

खा. सुनील तटकरे यांची माहिती

गेल्या काही वर्षांंपासून प्रलंबित राहिलेला मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाला असून, तालुक्यात हे मेडिकल कॉलेज उभे राहणार आहे. त्यासाठी जागेचा प्रश्न येत्या आठ-दहा दिवसांत सुटेल, अशी माहिती रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात होणार्‍या विकास कामांबाबत सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबतही त्यांनी माहिती दिली.

मेडिकल कॉलेजचा विषय हा भिजत घोंगडे होऊन पडला होता. जागेअभावी हा विषय मागे पडला. या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. 75 मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव असून, महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव सादर केल्यास त्याला परवानगी मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्यानंतर मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असल्याने त्याला लागूनच मेडिकल कॉलेज उभे करावे लागेल, असा राज्य शासनाचा दंडक आहे. त्यामुळे तालुक्यात जागेचा शोध घेण्यात आला आहे. 25 एकर जागा यासाठी लागणार आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज, हॉस्टेल्स, जिल्हा रुग्णालयाला जोडून इतर सुविधा देण्याचा प्रयत्न असेल.

- Advertisement -

मेडिकल कॉलेजप्रमाणेच 100 खाटांचे महिलांसाठी रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला. परंतु जागेअभावी तो मागे पडला. परंतु आता जिल्ह्यात दोन ठिकाणी महिलांसाठी 50 खाटांचे रुग्णालय उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही खा. तटकरे यांनी सांगून दंतचिकित्सा कॉलेजलाही राज्य शासनाने मंजुरी दिल्याने त्यासाठीही जागेचा शोध सुरू असल्याचे स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्ग, वडखळ ते इंदापूर परतीच्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगून या वर्षाच्या अखेरपर्यंत हा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे ते म्हणाले. सांबरकुंड धरणाच्या कामाची निविदा पावसाळ्यापूर्वी निघेल आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही खा.तटकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -