घरठाणेThane : ठाण्यात मेडिकल दुकानाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Thane : ठाण्यात मेडिकल दुकानाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

ठाणे: ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील पिंपळपाडा येथील .श्री कृष्णा मेडिकल या दुकानाला सोमवारी सायंकाळी सव्वा सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, फ्रिज, पंखा व एसी इनडोअर युनिट इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले आहे.

सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.

- Advertisement -

तसेच लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी काही मिनिटांत नियंत्रणात आणली. यावेळी 02- फायर वाहन व 01- रेस्क्यू वाहन पाचारण केले होते. तर हे दूकान नितीन जाधव यांच्या मालकीचे आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Amol Kolhe : खासदारपदाचा राजीनामा देणार, अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -