Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Mega Block : ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक...

Mega Block : ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक नाही; जाणून घ्या सविस्तर

Subscribe

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. १.५.२०२२ रोजी सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० या वेळेत ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान किमी 36/09-36/11 येथे मेट्रोसाठी आरएच गर्डर्स टाकण्यासाठी ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे.

डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.२० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेल करीता सुटणारी आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी ९.४८ ते सायंकाळी ४.१९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल / गोरेगाव विभागांमधील हार्बर मार्गावर कोणताही मेगाब्लॉक असणार नाही.

या ब्लॉकमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत.


- Advertisement -

हेही वाचा :जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत – जयंत पाटील


 

- Advertisment -