घरताज्या घडामोडी'Mixing of Vaccine' साठी भारतात मान्यता नाहीच - ICMR

‘Mixing of Vaccine’ साठी भारतात मान्यता नाहीच – ICMR

Subscribe

कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसीच्या अंतरामधील वेळापत्रकात सध्या कोणतेही बदल करण्यात आले नाही. तसेच कोरोनाविरोधी दोन्ही लसीचे डोस मिक्स पद्धतीने देण्याचा कोणताही प्रोटोकॉल सध्या मंजुर करण्यात आलेला नाही असे ICMR चे बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले. सध्या कोविशील्डच्या डोसमध्ये कोणताही बदल नसल्याचे त्यांनी सांगितले. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी १२ आठवड्यांचा वेळ असेल. कोवॅक्सीनच्या बाबतीतही हाच कालावधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मिक्सिंग ऑफ वॅक्सिंग प्रोटोकॉल अद्याप ठरला नसल्याचे त्यांनी सांगितले. कोवॅक्सीन आणि कोविशील्ड असे दोन डोस घेण्यासाठी कोणताही प्रोटोकॉल जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळेच सध्याच्या स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजरनुसारच डोस देण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले. मिक्सिंग ऑफ वॅक्सिंगसाठी सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संशोधन सुरू झाले आहे. दोन वेगवेगळ्या लस निर्मात्या कंपन्यांकडून तयार करण्यात आलेल्या लसी परिणामकारक आहेत का ? याबाबतचा अभ्यास करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या लसींमध्ये कोणताही परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे, पण कोणताही धोका किंवा लसीची रिएक्शन टाळता येण्यासारखी नाही. हे एका पद्धतीने न सुटलेला असे विज्ञानातील कोडे आहे, विज्ञानच हे कोडे सोडवेल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

भारतात होणार २ लसींच्या मिक्सिंगचा अभ्यास

येत्या काही आठवड्यांमध्ये भारतात दोन विभिन्न लसीच्या चाचपणीच्या अभ्यासाला सुरूवात होणार आहे, असे कोविड १९ च्या केंद्रातील प्रमुखाने स्पष्ट केले. डॉ एन के अरोरा हे नॅशनल टेक्निकल एडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन (NTAGI) चे अध्यक्ष आहेत. देशात लसीच्या मिक्सिंगचा प्रयोग करण्यात येणार आहे. दोन्ही लसीचा इन्युनिटी बुस्टिंगसाठी उपयोग होतो का ? याचा अभ्यास करण्यात येतो. तसेच लसीचे दोन्ही डोस हे रोगप्रतिकारक शक्ती कशा पद्धतीने वाढवतात तसेच व्हायरसविरोधात कसे लढतात हेदेखील स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.

लस मिक्सिंगमुळे कोणतेही गंभीर परिणामांची शक्यता कमीच

केंद्राने आज मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, लसीचा कोणताही गंभीर किंवा वाईट परिणाम होईल याबाबतची शक्यता तशी कमीच आहे. पण अभ्यासाच्या माध्यमातून लसीच्या परिणामकतेची पडताळणी आणि अधिक माहिती मिळण्यासाठी मदत होईल असेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० जणांना कोविशील्डचा डोस दिल्यानंतर कोवॅक्सीनचा डोस हा चुकून दिल्यानंतर केंद्राकडून हे स्पष्टीकरण समोर आले आहे. सध्याच्या केंद्राच्या स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (SOP) नुसार एकाच लस उत्पादकाचे दोन्ही लसीचे डोस प्रत्येक व्यक्तीला देणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -