शिंदेंच्या धनुष्यबाणासमोर कोणाचाच बाण टिकणार नाही, अब्दुल सत्तारांकडून कौतुकोद्गार

मुंबईच्या रविंद्र नाट्यगृहात रविंद्र सत्तार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

abdul sattar

आपली शिवसेना ओरिजिनल शिवसेना आहे. शिंदेच्या धनुष्यबाणासमोर कोणचाच बाण टीकणार नाही, अशा शब्दांत आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. मुंबईच्या रविंद्र नाट्यगृहात रविंद्र सत्तार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. (MLA Abdul Sattar appreciated CM Eknath shinde)

हेही वाचा – अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अडवला अजित पवारांच्या गाडीचा ताफा, शेतकऱ्यांची नक्की मागणी काय?

अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी स्तुतीसुमने वाहिली. रात्री दोन वाजता त्यांनी मतदारसंघासाठी निधी वाटप केला. गेल्या काही वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री, मत्र्यांनी जी मदत केली नाही, ती मदत एकनात शिंदे यांनी केली. आमच्या सिल्लोडसाठी सूत गिरणी पाहिजे होती, १९८० पासून ही आमची मागणी होती. पण ही मागणी ८० तासांत एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये ही भूमिक शिंदेंची आहे. जो माणूस न्याय देतो असा मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिला, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा – ‘आता संघर्ष नाही..’ मराठा आरक्षावर नितेश राणेंच ट्विट