मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी १५ लॅबमध्ये होणार टेस्ट, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

देशात कोरोना रूग्ण संख्येचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सचा धोका सुद्दा देशात वाढत आहे. मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी १५ लॅबमध्ये टेस्ट केली जाणार आहे. त्याचप्रमाणे काही आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी सरकारकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

देशात मंकीपॉक्स संसर्गाचा पहिला रूग्ण केरळमधील कोल्लममध्ये आढळून आला आहे. हा रुग्ण संयुक्त अरब अमिरात (UAE) मधून केरळला परतला आहे. तो यूएईमधील मंकीपॉक्सने बाधित रुग्णाच्या संपर्कात होता. त्याचे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते, तिथे त्याची पुष्टी करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी सहकार्य करण्यासाठी एक उच्चस्तरीय टीम केरळला पाठवली आहे. यामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), नवी दिल्ली येथील आरएमएल हॉस्पिटलचे डॉ. आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.

मार्गदर्शक तत्त्वांचे प्रमुख ठळक मुद्दे –

  • विदेशातून आलेल्या लोकांनी आजारी लोकांच्या संपर्कात येऊ नये.
  • माकडं, उंदीर यांसारख्या प्रजातींपासून दूर रहा.
  • मृत किंवा जिवंत वन्य प्राणी आणि इतर लोकांशी संपर्क टाळा.
  • मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे. तापासोबत अंगावर पुरळ उठते.
  • हा विषाणू प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो.
  • मंकीपॉक्सची पहिली केस २००३ मध्ये नोंदवण्यात आली होती.
  • वैद्यकीय विहित प्रोटोकॉलनुसार रुग्णालयांमध्ये क्लिनिकल व्यवस्थापन असावे.
  • मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांच्या व्यवस्थापनासाठी ओळखल्या गेलेल्या रुग्णालयांमध्ये पुरेसा मानव संसाधन आणि रसद सहाय्य सुनिश्चित केले जावे.


हेही वाचा : काँग्रेस ‘ISI एजंटकडून दहशतवादा विरोधात लढायचे ट्रेनिंग घेत होते- भाजपचा टोला