घरमहाराष्ट्रअमरावतीचे आमदार रवी राणांना धक्का; भोंग्याच्या मुद्यावरून पक्षातील 35 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

अमरावतीचे आमदार रवी राणांना धक्का; भोंग्याच्या मुद्यावरून पक्षातील 35 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्या उपस्थितीत केला. तेव्हापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या या भोंग्याविरुद्ध भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्या उपस्थितीत केला. तेव्हापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. राज ठाकरेंच्या या भोंग्याविरुद्ध भूमिकेला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, रवी राणा यांच्या पाठिंब्यानंतर नाराज झालेल्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. सर्वधर्मीय पार्टी म्हणून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची ओळख आहे. याच पक्षातील आता नेत्यांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आमदार रवी राणा यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस म्हणण्याची भूमीतका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी तारीखही जाहीर केली आहे. 22 एप्रिलला आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला. आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा केली होती.

- Advertisement -

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडलेला आहे. त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसाचे वाचन करावे अन्यथा मी व नवनीत राणा ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालीसाचे वाचन करू”, असा इशारा रवी राणा यांनी दिला होता. रवी राणा यांच्या इशाऱ्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

सर्वधर्मीय पार्टी म्हणून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची ओळख होती. मात्र राणा यांनी भाजपला समर्थन दिले. हिंदुत्ववादी विचाराचा पुरस्कार करीत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देत असल्याची माहिती अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अयुब खान यांनी दिली आहे. मागील निवडणुकीत आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच कॉंग्रेस नेते आशिष देशमुखांनी भरधाव वेगाने चालवली कार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -