घरमहाराष्ट्र'तेच मैदान, तीच गर्जना, हिंदुत्वाची ठाकरी तोफ', मनसेकडून औरंगाबाद सभेचा टीझर जारी

‘तेच मैदान, तीच गर्जना, हिंदुत्वाची ठाकरी तोफ’, मनसेकडून औरंगाबाद सभेचा टीझर जारी

Subscribe

मुंबई, ठाण्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे १ मे रोजी सभा होणार आहे. त्या सभेचा मनसेने टीझर लाँच केला आहे. या टीझरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुत्वाची ठाकरी तोफ, असा करण्यात आला आहे. याशिवाय, यामध्ये राज तिलक की करो तयारी, आ रहे है भगवाधारी, असं देखील या टीझरमध्ये म्हटलं आहे. मागील दोन सभांमध्ये राष्ट्रवादी, हिंदुत्व, मशिदींवरील या मुद्द्यांवर भाषण केलं. त्यामुळे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची औरंगाबादमधील सांस्कृतिर मंडळाच्या मैदानावरील सभा चांगलीच गाजली होती. आता त्याच मैदानावर आपली सभा होईल अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. त्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांना निवेदन देखील दिलं आहे. या सभेला पोलीस परवानगी देतात का हे पाहावं लागेवल. कारण वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी या सभेला विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये वातावरण तापण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पाडव्याच्या सभेला राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावर भाष्य केलं. त्यानंतर ठाण्याच्या सभेला राज्य सरकारला त्यांनी ३ मे पर्यंत मशिंदीवरील भोंगे खाली उतरावा असा अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना 3 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरत्या करण्याचे निर्देश दिले आहेत. मनसेच्या या नव्या घोषणेमुळे राजकीय वातावरण आणखीच तापणार असल्याचे दिसत आहे. शिवाय, महाविकास आघाडी सरकार आणि प्रशासन देखील आता काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -