घरट्रेंडिंगपत्री पुल बनला 'मिस्टर इंडिया', अन् लोकार्पणही झाले

पत्री पुल बनला ‘मिस्टर इंडिया’, अन् लोकार्पणही झाले

Subscribe

आले साहेब गेले साहेब, पत्रीपुल अजुन गायब असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याणमध्ये एक अनोखे आणि आगळेवेगळे असे आंदोलन केले. कल्याणमध्ये उभारल्या न गेलेल्या पत्री पुलाचे उद्घाटन करण्याचे आगळे वेगळे आंदोलन मनसे कल्याणकडून करण्यात आले. एका मागोमाग एक अशा नवनवीन डेडलाईन या पुलासाठी देण्यात येत असल्यानेच पत्री पुलाच्या डेडलाईन न पाहता आता मनसेने या पुलाचे उद्घाटन केले. कल्याण शहर विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी या पुलाचे औपचारिक उद्घाटन केले. गेली २५ वर्षे सत्तेत असणाऱ्यांचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आले. मनसेने या उद्घाटनाला अदृश्य पत्रीपुलाचा उद्घाटन सोहळा म्हणून उल्लेख केला आहे.

mns
मनसेचे अनोखे आंदोलन

तारीख पे तारीख जाहीर करत हे पत्री पूलच्या कामात दिरंगाई करत आहेत त्यांना जाब विचारला जावा व त्या वर अंकुश राहावं ह्या साठी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. कल्याणकरांच्या सहनशीलतेचा अंत, सत्ताधाऱ्यांना नाही कसली खंत अशा आशयाचे फलक याठिकाणी लागले आहेत. सत्ताधारी आरोपांच्या झाडतायत फेरी पत्री पुलाचा कोण कैवारी असेही फलकावर लिहिण्यात आले आहे. शिवसेनेला टार्गेट करत सत्ताधारी पक्षाने नागरिकांना फसवून दाखवले असेही या फलकांवर नमुद करण्यात आले आहे.

- Advertisement -

महापौरांनी दिली नवीन डेडलाईन

कल्याणकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पत्रीपुलाची नवीन डेडलाइन समोर आली आहे. या पत्रीपुलाच्या कामाच्या पूर्णत्वासाठी देण्यात आलेली फेब्रुवारी २०२० ची तारीख उलटल्याने आणि कामाला विलंब होत असल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी भाजपच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी भाजपने शिवसेना आणि पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मार्च २०२० महिन्यात पूलाच्या कामाची तारीख दिलेली असताना महापौर विनीता राणे यांनी मे २०२० ची तारीख दिल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -