घरताज्या घडामोडीभाजपशी युती करा सत्तेत येऊ, पुणे मनसैनिकांची राज ठाकरेंकडे मागणी

भाजपशी युती करा सत्तेत येऊ, पुणे मनसैनिकांची राज ठाकरेंकडे मागणी

Subscribe

शिवसेनेच्या सभेनंतर मात्र मनसे नेत्यांकडून भाजपी युती करण्याचा सूर उमटत आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पुणे दौरा करत आहेत. पुण्यात सत्ता आणण्यासाठी मनसे रणनिती आखत आहे. परंतु पुण्यातील मनसैनिकांनी भाजपशी युती करण्याची मागणी केली आहे. भाजपशी युती केल्यास सत्तेत येऊ असे पुणे मनसैनिकांचे म्हणणे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात रविवारी सभा घेतली असून शिवसैनिकांना कामाला लागण्याचा सूचना दिल्या आहेत. शिवसेनेच्या सभेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. मनसैनिकांच्या मागणीवर राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेने सर्व राजकीय पक्षांच्या आधीच सुरुवात केली आहे. पुण्यात सत्ता आणण्यासाठी मनसेच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेच्या सभेनंतर मात्र मनसे नेत्यांकडून भाजपी युती करण्याचा सूर उमटत आहे. आगामी निवडणुकीत मनसेने भाजपशी युती करावी, भाजपशी युती केल्यास मनसेला फायदा होईल असे पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पुणे दौरा करत असून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रभाग रचना बदलण्याची शक्यता असल्यामुळे चाचपणी सुरु केली आहे. यादरम्यान मनसैनिकांनी युतीची मागणी केल्यामुळे राज ठाकरेंचे भूमिका काय आहे? हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

९० जागांवर लक्षकेंद्रित

पुण्यात महानगरपालिकेत मनसे सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. यामध्ये १६४ पैकी ९० जागांवर मनसे लक्षकेंद्रित करणार आहे. महानगरपालिका २०२२ मध्ये पुण्यात ४५ जागांवर निवडून येतील असा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मागील निवडणुकीत मनसेचे नगरसेवक कमी झाले. पुण्यातील प्रभाग रचनेमुळे नगरसेवक कमी झाले असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परंतु पुण्यात मनसेचा प्रभाव कमी झाल्याचे दिसत आहे.


हेही वाचा : सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी सेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलाला ईडीचं समन्स

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -