घरताज्या घडामोडीलँड रोव्हर... स्टिअरिंग... आणि राज ठाकरे

लँड रोव्हर… स्टिअरिंग… आणि राज ठाकरे

Subscribe

नाशिक मनसे युनिटच्या सव्वा कोटींच्या रेंज रोव्हर डिफेंडरची सर्वत्र चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दौरा नेहमीच चर्चेत राहतो. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौर्‍यावर असलेल्या राज ठाकरे यांचा दौराही अशाच एका कारणामुळे चर्चेत आला आहे, तो म्हणजे त्यांच्याकडील लँड रोव्हरच्या डिफेंडर या अलिशान गाडीमुळे. राज ठाकरे यांनी स्वतः या गाडीचे स्टिअरिंग हाती घेत गुरूवारी ड्रायव्हिंग केले. नाशिक मनसे शहर शाखेच्या नावावर या गाडीची नोंद असल्याने याची जोरदार चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती.

याबाबत अधिक माहिती घेतल्यावर अखेर या गाडीचे रहस्य उघड झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या सडेतोड भूमिकेमुळे चर्चेत असतात. त्यांच्या स्टाईलवर फिदा होणार्‍या तरुणांचा एक मोठा वर्ग मनसेकडे आहे. राज यांची ही क्रेझ कमी झालेली नाही. अनेकदा राज स्वतः कारचे स्टिअरिंग हाती घेत सारथ्य करताना दिसून येतात. नाशिकमध्येही एका कार्यक्रमासाठी जाताना राज ठाकरेंना ड्रायव्हिंग करण्याचा मूड झाला. पण त्यांनी आपल्या नेहमीच्या कारमध्ये न बसता थेट नव्या कोर्‍या लँड रोव्हरचे स्टिअरिंग हाती घेतले. राज ठाकरेंकडील उच्च श्रेणीतील ही गाडी नेमकी कुणाची याबाबत विविध चर्चांना उधाण आले.

- Advertisement -

अनेकांनी तर उत्सुकतेपोटी या गाडीवरील नंबर प्लेटचे फोटो काढत आरटीओच्या संकेतस्थळावर खातरजमा केली असता ही गाडी नाशिक मनसेच्या नावावर रजिस्टर असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही गाडी मनसे नाशिकने नोंदणी केली आहे. कोरोनासारख्या अडचणीच्या काळात सव्वा कोटीची गाडी नाशिक मनसेने विकत घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मेळावा आटोपून राज ठाकरे पुन्हा याच गाडीने निघाले.

काय आहे गाडीचे रहस्य?

राज ठाकरे यांचे ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील एक चांगले मित्र नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांच्या पारिवारीक संबंधांमुळे अमित ठाकरे यांचेही त्यांच्या मुलाशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. मिळालेल्या माहितीनुसार अमित ठाकरे आणि संबंधितांचा मुलगा परदेशात शिक्षणासाठी एकत्र होते. त्यानंतर ते भारतात परतले. आता अमित ठाकरे यांच्यासाठी लँड रोव्हरची डिफेन्डर कार खरेदी करायची होती. मात्र, महाराष्ट्रात या श्रेणीतील गाडी नसल्याने राज ठाकरे यांनी ही जबाबदारी ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आपल्या नाशिकच्या मित्रावर सोपवली. आता साहेबांचाच आदेश म्हटल्यावर महोदयांनी थेट कर्नाटकातून ही गाडी उपलब्ध करून दिली. या गाडीचे रजिस्ट्रेशन नाशिकमध्ये करण्यात आले, तेही मनसेच्या नावावर.

- Advertisement -

असाही योगायोग…

राज ठाकरेंसाठी ९ हा शूभ आकडा असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या गाडीचा क्रमांकही ९ आहे. परंतु, राज ठाकरेंनी स्टिअरिंग हाती घेतलेल्या गाडीचा क्रमांक ६ का, असा प्रश्न उपस्थित झाला. राजपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरे यांचा वाढदिवस २४ मे रोजी असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेची बेरीज ६ येते. तर नाशिकचा आरटीओ पासिंग क्रमांक एम.एच. १५ असा आहे. या कोडची बेरीजही ६ येते. अमित यांना ६ हा लकी आकडा मानला जात असल्याने आगामी महापालिकेत मनसेला लॉटरी लागणार का, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे.

मनसेच्या नाशिक युनिटने घेतलेल्या MH-15 पासिंग डिफेन्डर गाडीच्या आरसी बूकची ही ऑनलाईन कॉपी
मनसेच्या नाशिक युनिटने घेतलेल्या MH-15 पासिंग डिफेन्डर गाडीच्या आरसी बूकची ही ऑनलाईन कॉपी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -