घरमहाराष्ट्रमुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन

मुंबईत १० जूनला मान्सूनचे आगमन

Subscribe

मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा येत्या १० जूनसाठी उत्तर कोकणासाठी देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड भागात देण्यात आला आहे. सरासरी ३० किमी ते ४० किमी प्रति तास या वेगाने वार्‍याचा वेग या कालावधीत असेल. त्यामुळे उत्तर कोकणाच्या पट्ट्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत मान्सुनचा अंदाज मांडण्यात मुंबई हवामान प्रादेशिक विभागाला पुन्हा एकदा यश आले आहे.

मुसळधार पावसासाठी आता वातावरण पोषक असल्याचे स्पष्टीकरण प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईचे उपमहानिदेशक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिले आहे. त्यामुळे मान्सूनचे अधिकृत आगमन येत्या १० जून रोजी मुंबईत होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

- Advertisement -

या काळात वेगाने वारे वाहतील. तसेच ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मान्सूनचा अंदाज याआधीच हवामान विभागाकडून देण्यात आला होता. केरळमध्ये १ जूनमध्ये मान्सून दाखल होईल. तर मुंबईत साधारणपणे ११ जून ही आधीची तारीख हवामान विभागाकडून जारी करण्यात आली होती. आता मान्सूनसाठी सकारात्मक परिस्थिती तयार झाल्याने मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश होत आहे, अशी घोषणा हवामान विभागाकडून अधिकृतपणे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -