घरताज्या घडामोडीबैलगाडा शर्यतीसंदर्भात अमोल कोल्हेंचा अढळराव पाटलांना फोन

बैलगाडा शर्यतीसंदर्भात अमोल कोल्हेंचा अढळराव पाटलांना फोन

Subscribe

अमोल कोल्हे यांनी आढळराव यांना केलेल्या फोनमुळे सर्वांनाच मोठा धक्का

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe) यांनी आज बैलगाडा शर्यतीसंदर्भात माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil ) यांना फोन केला. (mp Amol Kolhe call to Adhalrao Patil regarding bullock cart race)  बैलगाडा शर्यत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून यात कोणताही पक्षभेद, वयक्तिक प्रतिष्ठा आड आणू नका, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले. त्याचप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन हा विषय हातळूया अशी भूमिका घेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना शर्यती बंदी उठविण्यासाठी नव्याने रणनिती आखण्यासाठीच्या बैठकीत सहभागी व्हा अशी विनंती देखील केली.

खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार आढळराव पटील यांच्यातील संबंध सर्वश्रूत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यात रंगलेला वाद चांगलाच चर्चेत आला होता. मात्र बैलगाडा शर्यतीसंदर्भात अमोल कोल्हे यांनी आम्ही एक असल्याचे इशारा दिला आहे. अमोल कोल्हे यांनी आढळकरांना फोन केल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. अमोल कोल्हे यांनी आढळराव यांना केलेल्या फोनमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

खासदार अमोल कोल्हे यांनी माजी खासदार आढळराव पाटालांना फोन करुन बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याविषयी नव्याने रणनिती आखण्यासाठी पुढाकार घेतला. बैलगाडा शर्यत बंदी विरोधात सर्वांची एकजूट दिसली पाहिजे त्यामुळे सर्व पक्षातील आजी माजी खासदार आणि आमदार प्रमुख बैलगाडा मालक संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी यांची वज्रमूठ बांधून बैलगाडा बंदी विरोधात लढा द्यायचा आहे. यासाठी आपलेही मार्गदर्शन व्हावे अशी विनंती अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांनी केली.

शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्यांच्या काही पूर्वनियोजिक कामांमुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले. त्यासंदर्भात ट्विट करत त्यांनी माहिती दिली. अमोल कोल्हे यांची नंतर वेळ घेऊन चर्चेसाठी जाऊ असे देखील आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काळे फासणारे तुमच्यासोबत, तुम्ही गप्प का?, अरविंद सावंतांचा गडकरींना सवाल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -