घरमहाराष्ट्रअधिकाऱ्यांना मिळणारा ‘रजा प्रवास भत्ता' बंद करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

अधिकाऱ्यांना मिळणारा ‘रजा प्रवास भत्ता’ बंद करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

Subscribe

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले आहे. या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाकडून काटकसरीचे धोरण राबवण्याची सुरुवात केली आहे. एसटी महामंडळातील वर्ग १ व वर्ग २ च्या पदातील अधिकाऱ्यांना मिळणारा ‘रजा प्रवास भत्ता’ आता महामंडळाने बंद केला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीत व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहे. लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्यामुळे महामंडळाच्या महसुलात लक्षणीय घट आली आहे. त्यामुळे या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने काटकसरीचे धोरण राबवण्याची सुरुवात केली आहे. ४० टक्के प्रवासी असलेल्या बसेसच्या फेऱ्या बंद करण्याचा तसेच रातराणीच्या फेऱ्यांमध्ये चालक तथा वाहकांची नियुक्ती करून एका वाहकांची बचत करण्याचे आदेश सुद्धा एसटी महामंडळाने दिले आहे.

- Advertisement -

आता त्याच पाठोपाठ एसटी महामंडळातील वर्ग एक आणि दोनच्या ५७८ अधिकाऱ्यांना मिळणारा ‘रजा प्रवास भत्ता’ बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासंबंधित वृत्त दैनिक आपलं महानगरने एप्रिल महिन्यात वृत्त प्रकाशित केले होते. ते आज खरे ठरले आहे.

काय आहेत रजा प्रवास भत्ता

शासनाच्या धर्तीवर महामंडळातील अधिकाऱयांना सहकुटुंब सहलीसाठी जाण्याकरिता एसटी महामंडळाकडून रजा प्रवास भत्ता देण्याची योजना आहेत. हा भत्ता दोन वर्ष २४ हजार रुपये तर चार वर्षात ४८ हजार रुपये अधिकाऱयांना देण्यात येत होते. या योजनांवर प्रत्येक वर्षी एसटी महामंडळाला लाखो रुपये खर्च करण्यात येत होते. मात्र, कोरोनाच्या या संकट काळात एसटीला आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे बचतीसाठी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


LockDown : कोरोनामुळे एसटीच्या ५७८ अधिकाऱ्यांना बसणार फटका
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -