घरCORONA UPDATECoronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२६९ कोरोनाचे नवे रुग्ण;११४ जणांचा मृत्यू

Coronavirus: गेल्या २४ तासांत मुंबईत १,२६९ कोरोनाचे नवे रुग्ण;११४ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईमध्ये कालच्या दिवशी मृतांच्या संख्येत घट झाल्यानंतर आज पुन्हा मृतांचा आकडा शंभरी पार गेला आहे. गेल्या २४ तासात मुंबईमध्ये १ हजार २६९ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ११४ जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या ६४ हजार ०६८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे ११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३४२३ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये शुक्रवारी ११४ जणांचा मृत्यू झाला.यातील ५९ मृत्यू हे १५ जून पूर्वीचे आहेत. तर ५५  मृत्यू हे १६ ते १८ जुनचे आहेत. त्यामध्ये ७९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ७८ पुरुष तर  ३६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ९ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ५५ जण हे ६० वर्षांवरील, तर ५० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ७९१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजार ३३९ वर पोहचली आहे. तसेच ४०१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३२ हजार २५७ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यात ३ हजार ८२७ नवे रुग्ण 

कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा ५ हजार ८९३ इतका झाला आहे. यासोबतच रुग्णांचा आकडा देखील वाढत असून आज दिवसभरात ३ हजार ८२७ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २४ हजार ३३१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ५५ हजार ६५१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर ६२ हजार ७७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज दिवसभरात १९३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

मोदीजी, महागाईने सामान्य जनतेचे चिपाड झाले, अजून किती पिळणार? – सचिन सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -