घरताज्या घडामोडीएसटी वाचवा, बक्षीस मिळवा

एसटी वाचवा, बक्षीस मिळवा

Subscribe

तोट्यातली एसटी नफ्यात आणण्यासाठी आता एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही टार्गेट देण्यात आले आहे...

तोट्यात गेल्या एसटीला बाहेर काढण्यासाठी एसटी महामंडळाने  प्रत्येक आगाराला दोन टक्क्यांनी प्रवासी वाढवण्याचे उद्दीष्ट प्रत्येक आगाराला आखून दिलेले आहे. तसेच उद्दीष्ठ साध्य करणार्‍या आगारांना रोख पारितोषिक मिळणार असल्याने बेस्टचा फॉमुला एसटी आगार घेणार आहे.बेस्ट प्रमाणेच एसटीत सुध्दा आता  प्रवाशांना खेचून आण्यासाठी आता एसटी कर्मचार्‍यारी अर्थांत लालपरीचे सैनिक  हातात फलक आणि मेगाफोन घेऊन प्रवाशांना आवाज देतना दिसणार आहे.

एसटी महामंडळाचा सरासरी 4 हजार 500 कोटी पेक्षा जास्त संचित तोटात आहे. इतकेच नव्हेतर दिवसेंदिवस प्रवासी संख्या कमालीची घट होत असल्यामुळे एसटीचे महसूल सुध्दा कमी होत आहे. एसटीच्या प्रवासी संख्या वाढविण्यासाठी परिवहण मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी बेस्टचा आदर्श समोर ठेवत प्रवासी वाढवा अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक आगाराला प्रत्येकी 2 टक्के प्रवासी संख्या वाढवण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक प्रवासी संख्या वाढवणार्‍या आगारांना प्रत्येकी दोन लाख, दीड लाख आणि एक लाख रुपयांचे रोख स्वरूपात बक्षिस मिळणार आहे. या रक्कमेतून आगारांतील महत्त्वाची कामे करून घेता येणार आहेत. त्यामुळे आगारांमध्ये विविध सुविधा मिळाव्यात म्हणून कर्मचार्यांमध्ये संबंधित पारितोषिक मिळवण्यासाठी चढाओढ लागली आहे.त्यासाठी लालपरीच्या सैनिकांनी आता बेस्टचा फॉमुला वारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे कर्मचारी आता एसटी बस स्थानकांत  आणि आगारात प्रवाशांनी एसटीतून प्रवास करावायासाठी  हातात फलक आणि मेगाफोन घेउुुन प्रवाशांना आवाज देतना दिसणार आहे. त्यासाठी अनेक आगारात तैयारी सुध्दा सुरु झाली आहे.

 कारवाईचा भितीमुळे बेस्टच मलम

एसटीचे प्रवासी संख्या वाढवणार्‍यावर रोख पारितोषिकांची लूट करणार्‍या महामंडळाने प्रवासी संख्या घटणार्‍या आगारांना कारवाईचा इशाराही दिला आहे. या कारवाईत खराब कामगिरी करणार्‍या चालक व वाहकांची नावे चांगल्या कारवाई करणार्‍या चालक व वाहकांसोबत आगारांत झळकणार आहेत. याउलट खराब कामगिरीस कारणीभूत ठरणार्‍या अधिकार्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली करण्याचा इशारा महामंडळाने दिला आहे. त्यामुळे चालक व वाहकांसह आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक अशा सर्वच स्तरांवरील अधिकार्‍यांमध्ये भिती निर्माण झाली आहे.त्यामुळे भितीपोटी एसटी महामंडळाती सर्वच कर्मचारी आता कामाला जोमात लागले आहे. त्यामुळे बेस्टमधील फॉमुला वारण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती एका अधिकार्‍यांनी नाव न छापण्याचा अटीवर दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -