घरताज्या घडामोडीपनवेलमध्ये ५५ वर्षीय महिलेवर अज्ञातांचा गोळीबार

पनवेलमध्ये ५५ वर्षीय महिलेवर अज्ञातांचा गोळीबार

Subscribe

एका अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली

पनवेल तालुक्यातील उलवे परिसरात राहणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेची एका अज्ञात इसमाने गोळी मारून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उलवे परिसरात घडली. प्रभावती भगत असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

एनआरआय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उलवे येथे राहणारे बाळकृष्ण भगत हे दुपारी दीडच्या सुमारास पनवेल येथील नातेवाईकांकडे कारने निघाले होते. पनवेलला जाताना उलवे सेक्टर 23 येथे रस्त्याकडेला गाडी उभी करून श्री भगत जवळच्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये गेले. त्यांची पत्नी  येथील प्रभावती या गाडीतच बसून होत्या. अचानक एक लुटारू लुटण्याच्या इराद्याने आला आणि गाडीसह प्रभावती यांचे अपहरण केले. हल्लेखोराने प्रभावती यांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी जोरदार विरोध केल्याने हल्लेखोराने त्यांच्या छातीत गोळी मारली, आणि गाडी उलवे सेक्टर 19 परिसरात सोडून पळून गेला.

- Advertisement -

थोड्या वेळाने एटीएम बाहेर आलेल्या  बाळकृष्ण यांनी पाहिले की आपली गाडी आणि पत्नी दोन्ही गायब आहेत, त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला सांगून एन आर आय पोलीस ठाण्यात कळविले. मात्र थोड्याच वेळात सदर प्रकार उघडकीस आला. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले, आणि प्रभावती यांना अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू छातीत गोळी लागून झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पोलीस अधीक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -