घरदेश-विदेशमुकेश अंबानी भारत सोडणार? लंडनला घेतलं ५९२ कोटींचं अलिशान घर

मुकेश अंबानी भारत सोडणार? लंडनला घेतलं ५९२ कोटींचं अलिशान घर

Subscribe

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय लवकरच लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी लंडनच्या बकिंगहमशायर येथे ३०० एकरमध्ये पसरलेली स्टोक पार्क ही मालमत्ता तब्बल ५९२ कोटींना विकत घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात अंबानी कुटुंबीय लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे बोलले जात आहे. ‘मिड डे’ या इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार स्टोक पार्क येथे ३०० एकरमध्ये पसरलेले एक घर विकत घेतलं आहे. या घराची किंमत ५९२ कोटी असून त्यात ४९ बेडरूम आहेत. तसंच, स्विमिंग पूल, छोटेखानी रुग्णालय, क्लब, ऑडिटोरियम, पार्कचा गोल्फकोर्सचाही समावेश आहे. इतकेच नाही तर घरासाठी वेगळा रस्ताही असणार आहे. सध्या याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचं काम सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबीयांसह याठिकाणी रहायला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्टोक पार्क हे अंबानी कुटुंबीयांचे सेकंड होम असेल. यापूर्वी लॉकडाऊनच्या काळातही अंबानी कुटुंबीय रिलायन्सचा तेलशुद्धीकरण प्रकल्प असलेल्या जामनगर येथे जाऊन राहिले होते.

- Advertisement -

स्टोक पार्कमध्ये असणार मंदिर

स्टोक पार्कमध्ये अँटिलियाप्रमाणेच मंदिराची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी राजस्थानहून खास संगमरवरी गणपती, हनुमान आणि राधाकृष्णाची मूर्ती मागवण्यात आली आहे. या मंदिराची पूजा करण्यासाठी खास मुंबईहून दोन पुजारी लंडनला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अंबानी कुटुंबीय लंडनमध्येच आहेत. याठिकाणी सर्व गोष्टी मार्गी लागल्यानंतर अंबानी कुटुंबीय मायदेशी परततील, असे सांगितले जाते.

- Advertisement -

स्टोक पार्कची वैशिष्ट्ये

स्टोक पार्क हे ३०० एकरमध्ये पसरले आहे. १९०८ पर्यंत स्टोक पार्क खासगी मालमत्ता होती. त्यानंतर याचे रुपांतर कंट्री क्लबमध्ये झाले. स्टोक पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल आणि गोल्फ कोर्स आहे. जेम्स बाँडच्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण स्टोक पार्कमध्ये झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -