घरमहाराष्ट्रमुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

मुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण, रुग्णालयात दाखल

Subscribe

मुंबई –उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनंत अंबानी यांना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने ते काल एचएन रिलायन्स रुग्णालयात गेले होते. त्यांनंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अनंत अंबानींचा नव्या एनर्जी व्यावसायात समावेश –

- Advertisement -

मागच्या आठवड्यात झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएममध्ये, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानींचा नव्या एनर्जी व्यावसायात समावेश करण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी रिलायन्स जिओ इन्फोकॉमची कमान मोठा मुलगा आकाश अंबानीकडे आणि रिलायन्स रिटेल व्यवसाय मुलगी ईशा अंबानीकडे सोपवला आहे.

यांनी घेतले अंबानी यांच्या घरी गणपती दर्शन –

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. याशिवाय बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणइ त्याची पत्नी दीपिका पदुकोन यांनीही अंबानींच्या घरी गणरायाचे दर्शन घेतले होते.

मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानींसाठी दुबईत खरेदी केले महागडे घर –

मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानीसाठी दुबईतले सर्वात महागडे घर खरेदी केल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते.  त्यामुळे काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी चर्चेत आले होते. 80 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 640 कोटी भारतीय रुपयांमध्ये या घराचा करार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -