घरमहाराष्ट्रअनिल देशमुखांना दिलासा नाहीच! कोर्टाने सीबीआयच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळला

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! कोर्टाने सीबीआयच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज फेटाळला

Subscribe

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्याविरोधातील सीबीआयच्या गुन्ह्यातील जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणे अनिल देशमुख यांनाही यंदाची दिवाळी तुरुंगात साजरी करावी लागणार आहे. देशमुखांना ईडीच्या गुन्ह्यातून जामीन मिळाला आहे, मात्र सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामीन मिळाला नाही. देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सीबीआयच्या गुन्ह्यातील त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

कथित भ्रष्ट्राचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, याप्रकरणाचा तपास सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग करत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणातून 4 ऑक्टोबर रोजी अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला, त्यानंतर देशमुख यांनी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातूनही जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला, मात्र आज कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

100 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने नोव्हेंबर 2021 मध्ये अटक केली होती, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लावलेल्या आरोपानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. यानंतर ईडीनेही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. देशमुख यांनी आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर करून मुंबईतील विविध बार आणि रेस्टॉरंटमधून 4.7 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा ईडीने केला होता. चुकीने कमावलेले हे पैसे नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेला पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता.


संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच! पुढील सुनावणी 13 नोव्हेंबरला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -