घरमहाराष्ट्रमुंबई गुन्हे शाखेला सचिन वाझेचा ताबा ,१ नोव्हेंबर रोजी घेणार ताब्यात

मुंबई गुन्हे शाखेला सचिन वाझेचा ताबा ,१ नोव्हेंबर रोजी घेणार ताब्यात

Subscribe

गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात मुंबई गुन्हे शाखेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा ताबा मिळणार आहे. गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात सचिन वाझेचा ताबा मिळण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो मान्य करून तळोजा कारागृह वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वाझेच्या प्रकृतीबाबत माहिती मागवली होती. वाझे हा प्रवास करू शकतो, अशी माहिती कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी दिली असून १ नोव्हेंबर रोजी वाझेचा ताबा गुन्हे शाखा घेणार आहे.

गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा आरोपी आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ११ कडे देण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात मुख्य आरोपी हे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह असून यांच्या विरोधात गुन्हे शाखेकडून नोटीस पाठवण्यात आलेली होती.

- Advertisement -

दरम्यान अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे याला अटक करण्यात आली असून सध्या तो तळोजा कारागृहातील वैद्यकीय वॉर्डमध्ये आहे. वाझे याची नुकतीच हृदय शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. दरम्यान गोरेगाव येथील एका हॉटेल व्यावसायिकाने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंह, सचिन वाझे आणि इतर सहकारी आरोपी आहेत.

सध्या हा तपास गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखा कक्ष ११ कडून परमबीर सिंह यांना नोटीस बजावली असून त्यांना चौकशीकामी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. तसेच सचिन वाझे याचा या गुन्ह्यात ताबा मिळवण्यासाठी गुन्हे शाखेने एनआयएच्या विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

- Advertisement -

न्यायालयाने शुक्रवारी या अर्जावर सुनावणी देत तळोजा कारागृह वैद्यकीय अधिकार्‍यांकडे वाझे याच्या प्रकृतीबाबत माहिती मागवली होती. वाझे हा प्रवास करू शकतो, असा अहवाल कारागृह वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिल्याने न्यायालयाने वाझे याचा ताबा घेण्यासाठी गुन्हे शाखेला मंजुरी देत सोमवारी १नोव्हेंबर रोजी सचिन वाझे याला ताब्यात घेण्यास संमती दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -