घरताज्या घडामोडी'ही जन आशीर्वाद नाही जन छळवणूक यात्रा', महापौरांचा भाजपला टोला

‘ही जन आशीर्वाद नाही जन छळवणूक यात्रा’, महापौरांचा भाजपला टोला

Subscribe

'मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये येणे म्हणजे ही विरोधकांसाठी चांगलीच चपराक आहे. काम केले म्हणूनच ते नंबर पाचमध्ये आहेत. विरोधकांचे मीठ आळणीच राहिले,अशी सणसणीत टीका महापौरी यावेळी केली.

केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या ४ नव्या मंत्र्यांची वर्णी लागली आहे. भाजपचे  चार केंद्रीय मंत्री राज्यातील विविध भागात जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Rally) काढणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane)  दादरमधील शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाबेह ठाकरे यांच्या स्मृर्तीस्थळाला भेट देऊन १९ ऑगस्ट रोजी जन आशिर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत जन आशिर्वाद यात्रेची खिल्ली उडवत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी भाजपवर चांगलेच टिकास्र सोडले आहे. ‘ही जन आशीर्वाद यात्रा नाही तर ही जन छळवणूक यात्रा आहे’, असे म्हणत महापौरांनी जन आशीर्वाद यात्रेची चांगलीच खिल्ली उडवल्याचे पहायला मिळाले. (Mumbai Mayor Kishori Pednekar slam BJP over Jan Ashirwad rally)  ‘कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता भाजपला आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाही’, अशी टीका महापौरांनी केली.

पुढे महापौरांनी राज्याचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आल्याने विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले. ‘मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये येणे म्हणजे ही विरोधकांसाठी चांगलीच चपराक आहे. काम केले म्हणूनच ते नंबर पाचमध्ये आहेत. विरोधकांचे मीठ आळणीच राहिले,अशी सणसणीत टीका महापौरी यावेळी केली. त्याचप्रमाणे विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता लसीकरणाकडे लक्ष द्यावे.आम्हाला कोणी टार्गेट केले तरी आम्हाला काही फरक पडत नाही असे देखील महापौर म्हणाल्या.

- Advertisement -

कोरोना लसीकरणाबाबतही महापौरांनी भाजपवर खोचक टीका केली. महाराष्ट्रातील मंदिरे उघडी करण्यात आलेली नाहीत. मात्र राज्याबाहेरची मंदिरे उघडण्यात आलीत. मंदिरे उघडण्यापेक्षा विरोधकांनी दिल्लीतून व्हॅक्सिन आणण्यासाठी प्रयत्न करावे,अशी खोचक टीका महापौरांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच मुंबई पालिकेची पुढील वर्षी होत असलेल्या मिशन ११४ची जबाबदारी देखील नारायण राणे यांच्यावर देण्यात आली आहे. १९ ऑगस्टपासून सुरू होणारी जन आशीर्वाद यात्र ही ७ दिवस चालणार असून १७० हून अधिक भागांना ते भेट देणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा – संजय राऊतांच्या टीकेवर कपिल पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले शिवसेनेच्या रॅलीत…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -